शिवोलीत पाण्‍यासाठी एल्‍गार

..तर हणजूणवासीये उतरणार रस्‍त्‍यावर
Water problem has become serious in Siolim area So the citizens are angry
Water problem has become serious in Siolim area So the citizens are angry
Published on
Updated on

शिवोली : आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या पार्श्वभूमीवर हणजूण येथील ग्रामस्‍थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत गेली कित्येक वर्षे आपली पाण्यासाठी होणारी फरफट आज त्यांच्यासमोर मांडली. तसेच त्‍यांच्‍यावर प्रश्‍‍नांचा भडिमार केला. त्‍यामुळे उद्या बुधवार दि. 23 मार्चपासून शिवोली मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करण्याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.

शिवोलीच्‍या (Siolim) नवनिर्वाचित आमदार दिलायला लोबो यांनी बोलाविलेल्‍या ग्रामस्‍थांच्‍या या बैठकीला भरघोस प्रतिसाद लाभला. यावेळी त्‍यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी, पंचायत सदस्य सुरेंद्र गोवेकर, हनुमंत गोवेकर, शीतल दाभोलकर, संदेश खोर्जुवेकर, पेद्रू मेंडोसा, प्रतिमा गोवेकर, चिमुलकर आदी मान्यवरांची उपस्‍थिती होती.

Water problem has become serious in Siolim area So the citizens are angry
गोव्यात भाजपने शपथविधी तातडीने पूर्ण करावा, काँग्रेस आक्रमक

हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील जनता गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक मोर्चे तसेच आंदोलने ग्रामस्थांनी केली. पण त्‍याचा काही उपयोग झाला नाही. मात्र आमदार म्‍हणून निवडून येताच दिलायला लोबो यांनी शिवोली मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न प्राधान्‍याने हाती घेतला आहे. आतापर्यंत वेर्ला-काणका तसेच आसगाव पंचायत कार्यालयात यासंदर्भात बैठकाही झालेल्या आहेत.

हणजूणमध्ये आज मंगळवारी आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर पाण्याविना होणारे हाल तसेच तक्रारी मांडण्याबरोबरच या भागातील पाणीपुरवठा (water) सुरळीत करण्यासाठी आवश्यक सूचनाही केल्‍या. बैठकीअंती उद्या बुधवारपासून शिवोली मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, आतापर्यंतच्या प्रतिनिधींनी येथील जटील पाण्याच्या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यानेच सध्याची परिस्थिती उद्भवल्याचे आमदार (MLA) दिलायला यांनी सांगितले व पुढील दोन वर्षांत ही समस्या कायमची मिटवण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

Water problem has become serious in Siolim area So the citizens are angry
सरकारी इमारती रोगांपासून होणार मुक्त

..तर रस्‍त्‍यावर उतरणार!

हणजूण पंचायत (Panchayat) मंडळाने यापुढे कुठल्याही रहिवासी तसेच हॉटेल रिसॉर्टला ना हरकत दाखला देण्याआधी ग्रामस्थांना अगोदर पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अन्यथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी पंचायत मंडळाला देण्‍यात आला. हणजूण-कायसूव जैवसंवर्धन समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा, रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍सचे सत्यवान हरमलकर, सामाजिक कार्यकर्ते मायकल मेंडोसा, रवी हरमलकर, राजेश शिरोडकर, महाबळेश्वर फडते, ब्रेंडा डिसोझा, रमेश नाईक आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com