सासष्टी : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद वळवईकर यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी रोगनियंत्रण सासष्टी गट समितीची बैठक झाली. या बैठकीत मडगावातील बारा सरकारी इमारती पावसाळी रोगांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल, दक्षिण गोवा (goa) जिल्हा पोलिस (police) स्थानक, जुनी जिल्हाधिकारी इमारत, मडगाव अग्निशामक दल या चार इमारती व नंतर आणखी आठ इमारतींची निवड करण्यात येईल असे बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीला प्राथमिक आरोग्य केंद्रा, मडगाव (Margao) नागरी आरोग्य केंद्र, पंचायती, सार्वजनिक बांधकाम खाते, मलनि:स्सारण आदी खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक गावातील पाणी व मलनि:स्सारण समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल. डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांपासून सुटका मिळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना आखण्यात येईल असे वळवईकर यांनी सांगितले. या कामासाठी जलस्त्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनाही सामावून घेतले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
पावसाळी रोगांबाबत जनजागृती करण्यासाठी निमसरकारी संस्थांचे प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी यांची मदत घेतली जाईल. या बैठकीत जे निर्णय घेतले आहेत, त्याची अंमलबजावणी कितपर्यंत झाली याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच समितीची आणखी एक बैठक घेण्यात येईल, असे मडगाव नागरी आरोग्यकेंद्राचे प्रमुख डॉ. सुकोरो क्वाद्रोस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.