भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे कोलवाळमधली पाण्याची पाईपलाईन दुसऱ्यांदा फुटली; नागरिकांमधून संताप व्यक्त

Water Pipeline Break at Colvale: वीज विभागाकडून थिवी सबस्टेशन ते पेडणेपर्यंत भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे
underground power cables
underground power cables File Photo
Published on
Updated on

Water Pipeline Break at Colvale: प्रामुख्याने उन्हाळा सुरू असताना राज्यात ठिकठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. यातच कोलवाळ गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

underground power cables
Margao Palika : मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारी चेंबरमधून सीसीटीव्ही का हटविले?

परिसरात भूमिगत विद्युत केबल टाकण्याच्या कामामुळे ही लाईन फुटली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज विभागाकडून थिवी सबस्टेशन ते पेडणेपर्यंत भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. सोमवारी पाईप फुटल्याने भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर सोमवारी रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी मंगळवारी पुन्हा त्याच लाईनला तडे गेले.

पाणीपुरवठा लाईनची माहिती असतानाही ठेकेदाराने निष्काळजीपणाने काम करून मंगळवारी थोड्या अंतरावर पुन्हा त्याच लाईनचे नुकसान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, PWD अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, थिवी येथे सुरू असलेल्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामामुळे मंगळवारी दुरुस्त केलेली पाण्याची पाईपलाईन पुन्हा खराब झाली. पर्यायी उपाय म्हणून गावकऱ्यांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com