Water Shortage: हरमलमध्ये पाण्याची पातळी खालावली, शेतकरी संकटात

नागरिकांची मागणी : बंधारा योजना राबवा, जलसंवर्धन करा
Water Shortage
Water ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage मांद्रे मतदारसंघात पाण्याच्या टंचाईने नागरिक अस्वस्थ बनले असून जीवाची घालमेल गृहिणींच्या वर्मी लागली आहे. साधारणपणे वरचावाडा भाग पाणी टंचाईग्रस्त कधीच होत नव्हता. मात्र, यंदा अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक, गृहिणींनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, सरकारने प्रत्येक पंचायत क्षेत्रांत बंधाऱ्यांची सर्वंकष योजना तत्परतेने लागू करावी तसेच जलसंवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली आहे.

या पंचायत क्षेत्रातील वरचावाडा भाग पाणथळ भाग असून या भागात एक-दोन बंधारे तसेच बारमाही शेतीत वाहून घेणारे शेतकरी आहेत.

मात्र, सध्या पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यामुळे विहिरी उपसण्यासाठी पावले उचलली असल्याचे नागरिक सगुण नाईक यांनी सांगितले.

Water Shortage
Illegal Liquor Seized: ट्रॅव्हलमधून करत होते अवैध मद्य वाहतूक; अनमोड अबकारी विभागाने जप्त केला 45 लाखांचा माल

या भागातील मिरची पीक सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे धोक्यात आले असून, सरासरीपेक्षा 50 टक्के कमी उत्पादन अपेक्षित असल्याचे शेतकरी लवू ठाकूर यांनी सांगितले.

तरी सरकार व जलसंपदा खात्याने याबाबत अहवाल घेऊन शेतकरी व पंचायत मंडळाकडून होणाऱ्या सूचनांचा आढावा घ्यावा व प्रत्येक क्षेत्रांत योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.

Water Shortage
Fatorda News: फातोर्ड्यातील पार्किंग कामाबाबत पालिका अनभिज्ञ

टॅंकर भरण्यास दोन तास

पूर्वी अर्ध्या तासात टॅंकर भरला जायचा. मात्र, सध्या तास-दोन तास पाणी भरण्यासाठी लागत असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता त्या विहिरींचे पाणीही कमी होत असून लोकांना ताटकळत राहावे लागत असल्याने उशीर होतो. मात्र, ग्रामस्थांत त्याबाबत नाराजी पसरत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

दरवर्षी अन्य भागांतील विहिरींवर कधीही परिणाम झाला नव्हता. मात्र, यंदा प्रथमच अशी स्थिती उद्भवली आहे. पाण्याचे संवर्धन होणे काळाची गरज असून त्यासाठी सरकारने उपाययोजना राबविली पाहिजे व त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने उपक्रम राबविले पाहिजेत.

- सरोजनी नाईक, गृहिणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com