Goa Assembly Session: कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश यांचे फळदेसाईंनी गायिले गुणगान! वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024:कचरा प्रकल्प लोकवस्तीत नको; बायंगिणी परिसरात २० ते २५ हजार लोक राहतात असेही फळदेसाई यांनी सांगितले
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024:कचरा प्रकल्प लोकवस्तीत नको; बायंगिणी परिसरात २० ते २५ हजार लोक राहतात असेही फळदेसाई यांनी सांगितले
Rajesh PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात सध्या चांगले काम करत आहेत. बाबूश हे डॅशिंग मंत्री आहेत. २००२ मध्ये मनोहर पर्रीकरांच्या काळात आम्ही लहान असताना ‘बाबूश कोण?’ म्हणून पाहायला एकेक दिवस थांबत होतो, असे सांगत कुंभारजुवे आमदार राजेश फळदेसाई यांनी बायंगिणी कचरा प्रकल्‍पाच्‍या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

जागतिक वारसास्थळ म्हटल्यानंतर त्याकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प येऊ शकत नाही. जुने गोवे येथे दहा वर्षांनी ‘गोंयच्या सायबा’चे पार्थिव दर्शनासाठी ठेवतात. त्या कार्यक्रमाला लाखो भाविक येतात, दर्शन घेतात.

जर या परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प येत असेल तर ते योग्य नाही. जनतेला नको असलेल्‍या प्रकल्‍पांना, कामांना लोकप्रतिनिधीने विरोध केला पाहिजे. कचरा प्रकल्प व्हावा, पण लोकवस्तीत नको. बायंगिणी परिसरात २० ते २५ हजार लोक राहतात, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024:कचरा प्रकल्प लोकवस्तीत नको; बायंगिणी परिसरात २० ते २५ हजार लोक राहतात असेही फळदेसाई यांनी सांगितले
Goa Assembly Session: कोमुनिदाद जमीन हस्तांतरणात घोटाळे, सखोल चौकशी करा; आमदार फेरेरा

भाविकांच्‍या भावनांचा आदर करावा

१९९० मध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प आणण्याचे नियोजन झाले होते. त्यावेळी बायंगिणीत घरे नव्हती. मात्र आता याच प्रकल्पाच्या जागेला टेकून घरे बांधण्‍यात आलेली आहेत. कचरा प्रकल्पाच्या आसपास हिंदू-ख्रिश्चन लोक राहतात. त्यांच्या भावनांचा विचार मंत्री बाबूश यांनी करावा. चर्चला भेट देण्यासाठी जे लोक येतात. पण कचरा प्रकल्प झाला तर जुने गोव्यात कोणच येणार नाहीत. मंत्र्यांनी हे लक्षात घेऊन दुसरीकडे कुठे तरी जागा निश्‍चित करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com