Waste Management Campaign: पंचायतींनी ‘ब्लॅक स्पॉट’ दूर करण्यावर भर द्यावा; रमेश झर्मेकर यांचे आवाहन

रावण येथील ‘अंजुणे’च्या कालव्याची स्वच्छता
Waste Management Campaign
Waste Management CampaignDainik Gomantak

Waste Management Campaign: प्लास्टिक आणि इतर कचऱ्याच्या दुष्परिणामाची माहिती व्हावी, आणि ‘ब्लॅक स्पॉट’ बाबत गांभीर्य लोकांना कळावे, यासाठी ही स्वच्छता मोहीम आरंभली आहे. पंचायतीने अशा ‘ब्लॅक स्पॉट’वर लक्ष केंद्रित करून ते साफ ठेवण्यासाठी पावले उचलावीत,असे आवाहन विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे ज्येष्ठ सदस्य रमेश झर्मेकर यांनी केले.

Waste Management Campaign
Goa School Education: राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार करियर मार्गदर्शन; गोवा सरकारचे पाऊल

केरी सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील रावण व घोटेली २ भागातून जाणाऱ्या अंजुणे धरणाच्या कालव्याच्या ‘अक्वा डक्ट’ पुलाचा भाग कचऱ्यामुळे ब्लॅक स्पॉट बनला होता. तो भाग स्वच्छता अभियानाद्वारे विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, केरी जैवविविधता व्यवस्थापन समितीने साफ केला.

वाळवंटी स्वच्छता अभियानही राबविण्यात येत असून ‘मद्यपीचा अड्डा’ असलेल्या या परिसरातून प्लास्टिक, दारूच्या बाटल्या आणि इतर कचराही उचलला. यापूर्वी पेळावदा रावण येथील वाळवंटी तिरावरील उभो गुणो हा परिसर स्वच्छ केला होता.

यावेळच्या मोहिमेत सरपंच दीक्षा गावस तसेच सम्राट क्लब केरीचे अध्यक्ष ॲड. मोहन गावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन कचऱ्याची उचल केली. या मोहिमेत पेळावदा, घोटेली व परिसरातील विद्यार्थी तसेच केरी पंचायतीचे सहकार्य लाभले.

प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी तीन ‘आर’चा गांभीर्याने अवलंब करावा. यात प्लास्टिक घेणे टाळणे, प्लास्टिक घेतल्यास त्याचा पुनर्वापर करा, आणि जर ते उपयोगी ठरत नसेल तर ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा, हे तत्व जर अंमलात आणले तर प्लास्टिकचा कचरा कमी होईल.

-नंदा माजीक, अध्यक्ष जैवविविधता व्यवस्थापन समिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com