Goa Government on Career Program for School Education: गोवा सरकारने सर्व शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक करियर मार्गदर्शन आणि करियर तयारी प्रशिक्षण उपक्रम घेण्याचे ठरवले आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी अंतरंग आणि अध्ययन फाउंडेशनच्या भागीदारीत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारचा हा एक अग्रगण्य उपक्रम आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या करिअर कार्यक्रमांची घोषणा केली.
अधिकाऱ्यांनी इंग्रजी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, करिअर अवेअर कार्यक्रम इयत्ता 9 वी आणि 10 वी साठी लागू केला जाईल. विद्यार्थ्यांना आत्म-जागरूकता विकसित करण्यास, त्यांच्या आवडी आणि योग्यता समजून घेण्यावर आणि त्यांच्या करिअर योजनांमध्ये स्पष्टता मिळविण्यावर हा उपक्रम लक्ष केंद्रित करेल.
करिअर रेडी हा उपक्रम इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक रोजगार कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी आहे. 12 वी पूर्ण केल्यानंतर करिअरबाबत स्पष्ट योजना तयार करण्यात हा उपक्रम लाभदायी ठरेल.
2023 ते 2026 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
उपक्रमाचा एक भाग म्हणून, शाळेच्या वेळापत्रकात एक समर्पित करिअर कालावधी समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे आणि वेळेवर करिअर मार्गदर्शन मिळेल.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ करिअर नियोजनासाठी एक भविष्यवादी दृष्टीकोन देतोच, पण शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यावर देखील लक्ष केंद्रित करतो.
या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत स्पष्टता येईल. विद्यार्थी किमान पाच भिन्न करिअर ट्रॅक एक्सप्लोर करतील. जे उच्च शिक्षण, डिप्लोमा प्रोग्राम्स किंवा अप्रेंटिसशिपमध्येही लाभदायी ठरेल.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नियमित तज्ज्ञ स्पीकर टॉक, वेबिनार किंवा एक्सपोजर भेटींच्या माध्यमातून उद्योगातील एक्सपोजरचा लाभ घेता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.