Matka Shops In Goa: गोव्यातील मटका शॉप बंद ठेवण्याची मागणी कोणी आणि का केलीय?

Demand For Matka Shops Bandh: गुडफ्रायडेच्या दिवशी संपूर्ण गोव्यात मटका दुकाने बंद ठेवली जावीत, अशी मागणी वॉरन आलेमाव यांनी केली आहे.
Matka Shop
Matka ShopDainik Gomantak

Matka Shops Ban Demand

गुडफ्रायडेच्या दिवशी संपूर्ण गोव्यात मटका दुकाने बंद ठेवली जावीत, अशी मागणी वॉरन आलेमाव यांनी केली आहे.

गोव्यात दिवाळीसह इतर सणासुदीच्या काळात मटका दुकाने बंद ठेवली जातात, त्याचप्रमाणे गुडफ्रायडेला देखील मटका बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी आलेमाव यांनी केलीय.

Matka Shop
Goa Murder Case: पेडा - बाणावली खून प्रकरण; प्रियकर सूरज मायगेरीला 9 दिवसांची पोलिस कोठडी

गुड फ्रायडे आणि इस्टर संडे म्हणजे काय?

प्रभु येशू ख्रिस्तांना ज्या दिवशी क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. प्रभु येशूंचा त्याग, प्रेम आणि दया याची शिकवण पाहता या दिवसाला गुड फ्रायडे, असे म्हटले जाते.

गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते, आणि चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते.

प्रभु येशू ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी ते पुन्हा जिवंत झाले होते हा दिवस रविवार होता. यालाच इस्टर संडे म्हटले जाते. त्यानंतर 40 दिवस त्यांनी आपल्या अनुयायांसोबत वेळ घालवला.

अवैध असला तरी गोव्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम पद्धतीने मटका घेतला जातो. अनेक ठिकाणी दुकानात किंवा स्वतंत्र टपरीवर मटक्याचे आकडे लावले जातात. पोलिस यंत्रणा देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसते.

दरम्यान, मायकल लोबो यांनी गोव्यात मटका कायदेशीर करावा अशी मागणी यापूर्वी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com