'कब्रस्थान' जागेचा झोनबदल आदेश मागे घ्या अन्यथा..

नगरसेवक महेश आमोणकर यांचा इशारा : एसजीपीडीएत हरकत दाखल
Warning from corporator Mahesh Amonkar

Warning from corporator Mahesh Amonkar

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: सोनसोडो येथे यापूर्वी मुस्लिम कब्रस्थानासाठी जी जागा संपादित केली होती त्या जागेचा झोन बदल करून ही जागा विजेचे सब स्टेशन बांधण्यासाठी तसेच कमी मूल्याची घरे बांधण्यासाठी वापरण्यास खारेबांध प्रभागाचे नगरसेवक महेश आमोणकर (Corporator Mahesh Amonkar) यांनी विरोध केला असून हा झोन बदलाचा आदेश सात दिवसात मागे न घेतल्यासनिषेध म्हणून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

<div class="paragraphs"><p>Warning from corporator Mahesh Amonkar</p></div>
Good Governance Index 2021: ‘सुशासनात’ गोवा तिसऱ्या स्थानावर !

आमोणकर यानी आज काही मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीसह एसजीपिडीएच्या सदस्य सचिवांची भेट घेऊन आपले हरकतीचे निवेदन दिले. मडगावच्या नव्या बाह्य विकास आराखड्यात हा झोन बदल सुचविण्यात आला आहे.

मडगावातील (Margao) मुस्लिमांचा कब्रस्थानचा प्रश्न मागची कित्येक वर्षे भिजत ठेवला असून त्यांच्यावर आजपर्यंत अन्यायच केला. शिरवडे नावेली येथे कब्रस्थानासाठी जी पर्यायी जमीन संपादित केली आहे ती जमीन एका खासगी व्यक्तीने या पूर्वीच गरीब लोकांकडून पैसे घेऊन परस्पर विकून टाकली आहे. त्यावर कब्रस्थान बांधल्यास या गरीब लोकांवर अन्याय होईल त्यामुळे आधी जी जागा कब्रस्थानसाठी संपादित केली होती तिथेच हा प्रकल्प उभारावा अशी मागणी केली.

यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी रियाज शेख यांनी मडगावात राजकारण्यांनी नेहमीच मुस्लिमांवर अन्याय केला असून यापुढे असा अन्याय सोसून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com