Ponda Municipal Council Election 2023: प्रभाग 10 च्या पुनर्रचनेमुळे इच्छुकांचा हिरमोड; तिरंगी लढत निश्‍चित

शांताराम कोलवेकरांच्या पत्नी दीपा कोलवेवर निवडणुकीच्या रिंगणात
Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोवा बागायतदार, लेहरा हॉटेलपर्यंत म्हणजे बाजाराच्या सीमेपर्यंत हा पुनर्रचित प्रभाग क्रमांक 10 आता पोहोचणार आहे. काही प्रभागांची पुनर्रचना अनेक इच्छुकांचा हिरमोड करणारी ठरली आहे. काही प्रभाग तर जोडतोड करून बनवलेले दिसतात. त्यामुळे कोणत्या प्रभागातून उमेदवारी भरावी, या विवंचनेत असलेल्या अनेकांनी निवडणुकीपासून दूरच राहणे पसंत केले.

प्रभाग 10 इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकरांनी पत्नी दीपा यांना रिंगणात उतरवले आहे, त्यांना डॉ. केतन भाटीकरांच्या पॅनेल तर्फे उतरलेल्या मनस्वी मामलेदार यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. तर पूजा नाईक या या लढतीचा तिसरा कोन ठरणार आहेत.

Ponda Municipal Council Election 2023
Goa Dairy: गोवा डेअरीचे 9 संचालक अपात्र; सहकार निबंधकांची कारवाई

सुदिन ढवळीकरांच्या भूमिकेकडे लक्ष

यंदा प्रभाग 10 इतर मागासवर्गीय महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे फक्त तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या खेपेला या प्रभागातून सहा उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. आणखी या यंदाच्या फोंडा पालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याचे वीज मंत्री व ‘मगो’पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांची तटस्थ भूमिका.

अजूनतरी सुदिन यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. गेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी पालिका क्षेत्र अक्षरशः पिंजून काढले होते. आणि त्यामुळेच म. गो. प्रणित रायझिंग फोंडाने सात जागा प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे ढवळीकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोलवेकरांचे चुलत बंधू मामलेदारांसोबत !

या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन खेपेला शांताराम कोलवेकरांचे मुख्य प्रचारक असलेले त्यांचे चुलत बंधू गौरेश हे सध्या मामलेदार यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रभागातील तिरंगी लढतीची रंगत वाढायला लागली आहे.

Ponda Municipal Council Election 2023
Panjim Stray Dogs Case: पणजीत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होतेय वाढ; नागरिकांना त्रास

अनेक विकास कामे राबवली

नूतनीकरण केलेल्या विठोबा देवस्थानाचे कंपाउंड बांधणे, तीन विजेचे खांबे बसवणे, ट्रान्सफॉर्मर अपडेट करून त्याची शक्ती वाढवणे, कुरतडकर हाऊस ते महादेव खानोलकर यांच्या घरापर्यंतच्या गटारी बांधणे ही विकास कामे आपण केली असल्याचे नगरसेवक कोलवेकर यांनी सांगितले.

प्रभागात विकासाचे आव्हान

कोलवेकर हे या प्रभागातून दोन वेळा निवडून आले आहेत. गेल्या खेपेला ते भाजप पॅनलवर निवडून आले होते. नंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अनपेक्षितपणे ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी म. गो. पक्षाच्या डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा दिला होता. नंतर ज्या आठ नगरसेवकांनी भाजप प्रणित नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता, त्यात कोलवेकरही होते. पण नंतर त्यांनी रितेशना पाठिंबा देऊन तसेच भाजपमध्ये फेरप्रवेश करून रितेशची खुर्ची वाचवली होती.

प्रभागाच्या विकासाबद्दल विचारल्यावर कोलवेकरांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासाबद्दल माहिती दिली. पण या प्रभागाचा विकास करणे म्हणजे ‘आकाश हीच मर्यादा’ हा प्रकार आहे. या प्रभागात विकासाची आव्हाने खुणावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com