Warship Tourism: आणखी एक प्रोजेक्ट राज्याबाहेर! अंडरवॉटर म्युझियम महाराष्ट्रात स्थलांतरित! थंड प्रतिसादामुळे गमावली संधी

Underwater Warship Museum: राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्यामुळे पाण्यात बुडवण्यात येणाऱ्या युद्धनौकेचे पर्यटनस्थळांत रुपांतर करण्याचा प्रकल्प शेजारील महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे.
Underwater Warship Museum
Warship TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Underwater Warship Museum in Maharashtra instead of Goa

पणजी: राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्यामुळे पाण्यात बुडवण्यात येणाऱ्या युद्धनौकेचे पर्यटनस्थळांत रुपांतर करण्याचा प्रकल्प शेजारील महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. गोव्यातच शिकलेले पण सध्या पुणे येथे स्थायिक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी गोवा सरकारकडे तो प्रस्ताव मांडला होता.

त्या प्रस्तावात गोवा सरकारकडून रस दाखवला गेला नसल्याने त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे संपर्क साधला आणि आता मालवण जवळील निवती रॉक्स परिसरात हा प्रकल्प आकाराला येणार आहे. कुलकर्णींचे शिक्षण गोवा विद्यापीठात झाले, त्यानंतर ते दोनापावलच्या एनआयओमध्ये संशोधक होते. त्यामुळे गोव्यात हा प्रकल्प व्हावा यासाठी त्यानी प्रयत्न सुरू केले होते.

त्याला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव दिला आणि ऑस्ट्रेलियातून त्यांना महाराष्ट्रात बोलावून घेतले आणि प्रकल्पाची जबाबदारी दिली.

या साठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडून गुलदार ही लॅण्डींग युद्धनौका मिळवली आहे. कारवार येथे ही नौका नौदलाने महाराष्ट्राला दिली. ती निवती रॉक्स परिसरात नेऊन बुडवली जाणार आहे. त्या नौकेचे रूपांतर पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्तीमध्ये केले जाणार आहे.

मालवण येथून नौकेने पर्यटकांना त्या ठिकाणी नेऊन पाण्यात पाणबुडीसारख्या जाणाऱ्या २२ आसनी पाणवाहनातून या नौकेच्या ठिकाणी समुद्रात खोलवर नेले जाणार आहे. यामुळे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगशिवायही सागरी जीवसृष्टी आणि ऐतिहासिक युद्धनौका जवळून पाहता येईल.

नवे रोजगार!

युद्धनौका बुडवलेले हे ठिकाण डायव्हिंग व स्नॉर्कलिंगसाठी जागतिक दर्जाचे आकर्षण ठरेल. सिंधुदुर्ग हे पाण्याखालील पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण बनेल. ज्यामुळे स्थानिकांना नवे रोजगार उपलब्ध होतील असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. ही पाण्याखाली विसर्जित नौका विविध समुद्री जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करणार आहे. कृत्रिम प्रवाळभित्ती जलचरांसाठी संरक्षणात्मक अधिवास उपलब्ध करणार आहेत.

Underwater Warship Museum
G 20 Museum: ‘जी-२० संग्रहालया’तून होणार गोव्याच्या समृद्ध वारशाचे जतन; ऐतिहासिक स्थळे, संबंधित नकाशांचा समावेश

मालवणात प्रकल्प!

पर्यटकांना मालवण येथे एकत्र केले जाईल. एका मुख्य जहाजाद्वारे त्यांना समुद्रातील निश्चित जागी नेण्यात येईल. तिथून पर्यटक २२ आसनी अत्याधुनिक २२ आसनी पाणबुडीमध्ये बसून पाण्याखाली जातील. सागराच्या पृष्टभागाखाली उतरताना पर्यटकांना समुद्रातील चित्तथरराक दृश्ये, प्रवाळभित्ती, विविध प्रकारचे समुद्री जीव आणि गुलदरचे अवशेष पहायला मिळतील.

Underwater Warship Museum
G 20 Museum: ‘जी-२० संग्रहालया’तून होणार गोव्याच्या समृद्ध वारशाचे जतन; ऐतिहासिक स्थळे, संबंधित नकाशांचा समावेश

नौका विसर्जन!

नौका विसर्जनासाठी कोणतीही स्फोटके वापरण्यात येणार नाहीत तर नौकेचे पाण्याखालील दरवाजे उघडून हळूहळू समुद्राच्या तळाशी बसवले जाईल. नौका अंदाजे ५० मीटर खोलीवर स्थिरावेल. जिथे ते कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून विकसित होईल. त्यामुळे स्थानिक समुद्री जैवविविधतेला चालना मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com