Road in Wadi at Bhuipal
Road in Wadi at Bhuipal dainikgomantak

भुईपाल येथील वाड्याला रस्त्याची प्रतीक्षा

'येथे' नवख्या वाहन चालकांना किंवा पाहुण्यांना खड्डेमय रस्त्यातूनच काढावी लागते वाट

पिसुर्ले : पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील भुईपाल प्रभाग क्रमांक ९ मध्ये समाविष्ट असलेल्या चोडणकर वाड्यातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, या वाड्याला उत्तम दर्जाच्या रस्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. हा वाडा पूर्णपणे खड्डेमय रस्त्याच्या जाळ्यात सापडल्याने येथील नागरिकांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे या भागातील रस्त्यांचे अजूनपर्यंत कधीही डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे सुमारे ५३ घरे असलेल्या या छोट्याशा वाड्यावरील नागरिक चांगल्या रस्त्याची अपेक्षा बाळगून आहेत.

(Waiting Wadi in Bhuipal for Road)

याबाबत माहिती अशी की, पर्ये (Poriem) मतदारसंघात (constituency) येणाऱ्या होंडा पंचायतीच्या भुईपाल प्रभागात तसेच पिसुर्ले (Pissurlem) पंचायत क्षेत्रात येणाऱ्या शांतीनगर वाड्यांच्या अगदी जवळ चोडणकर नगरवाडा आहे. सुमारे ५३ घरांचा समावेश असलेल्या या वाड्यावरील नागरिक गुण्यागोविंदाने येथे राहतात. या वाड्यावर वीज (Electricity), पाणी (water) व रस्ता (roads) या सुविधा पोहचल्या आहेत. तरी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरुस्ती किंवा इतर भागात होत असलेले हॉटमिक्स डांबरीकरण झाले नसल्याने येथील नागरिकांना अजूनही पक्का रस्ता मिळालेला नाही. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नवख्या वाहन चालकांना किंवा पाहुण्यांना खड्डेमय रस्त्यातूनच वाट काढावी लागत आहे.

येथील अंतर्गत भागातील रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी येथील फडते नामक नागरिक सकाळी कामावर जाताना दुचाकी घसरून पडल्याने त्यांना दीड महिना काम सोडून घरीच राहावे लागले होते. अशाप्रकारे बऱ्याच वेळा अपघात (Accident) घडत असल्याने याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Road in Wadi at Bhuipal
वास्को : वास्कोत गॅरेजला लागलेली आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान

पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करा

चोडणकर वाड्यावर सध्या रस्त्यांची वाताहत झालेली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, दगड-धोंडे यावरून वाहने घसरून पडत आहेत. वारंवार घडणाऱ्या या अपघातामुळे (Accident) भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी येथील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे, अशी येथील रहिवासीयांची मागणी असून, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) रस्ता विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com