वास्को : वास्कोतील मांगोरहिल परिसरातील एका गॅरेजला सोमवारी आग लागल्याची घटना घडली. एका गॅरेजला आग लागून वाहनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. गॅरेजला लागलेली आग ही लावली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञाताने आग लावल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सोमवारी (दि. २८) पहाटे ही घटना घडली. या आगीत तीन दुचाकी व एका चारचाकीचा जळून खाक झाल्या आहे. या घटनेत पाच लाखांहून जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वास्को अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
(Fire to Garage in Mangur Hill Vasco News Updates)
वास्को (Vasco) ग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगोरहील येथील अंबाबाई मंदिरासमोरील गॅरेजबाहेर उभ्या ठेवलेल्या चार वाहनांना सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी (Fire Brigade) घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली; तोपर्यंत चारही वाहने आगीत जळून खाक झाली होती. जळून खाक झालेल्या वाहनात एका चारचाकी आणि तीन दुचाकीचा समावेश आहे. गॅरेजबाहेर ठेवलेल्या त्या चार वाहनांना आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप ही स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकान्यांनी सांगितले.
गॅरेजचे मालक महम्मद इशान यांच्याशी संपर्क केला असता त्या वाहनांना कोणीतरी जाणूनबुजून आग (Fire) लावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. जळून खाक झालेल्या त्या चार वाहनांपैकी चारचाकी आपल्या मालकीची असल्याची माहिती महम्मद यांनी देऊन सर्वात प्रथम आपल्या चारचाकीला आग लागल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गॅरेजमधील गाड्यांमध्ये बॅटरी, इंजिन किंवा कोणतेही पार्ट नव्हते. त्यामुळे शॉर्टसर्किटची शक्यताही नव्हती. आपण येत्या आठवड्याभरात गॅरेज सुरु करणार होतो. मात्र कुणीतरी पूर्वनियोजित कट रचून आग लावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकारात ५ लाखांचं नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. याप्रकरणाची वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी चौकशी करत आहेत . तर ज्याने ही आग जाणून बुजून लावली असल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी महम्मद यांनी केली आहे. वास्को पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
तब्बल पाच वर्षापासून चारचाकी पडून
तब्बल पाच वर्षापासून माझ्या मालकीची चारचाकी गॅरेजबाहेरच पडून होती. त्यात इंजिन, बॅटरी, सीट, पेट्रोल काहीच नव्हते. फक्त गाडीचा सांगाडा उभा होता. त्यामुळे त्यात शॉर्टसर्किट (Short circuit) होऊन आग लागूच शकत नसल्याचे महम्मद यांनी सांगितले. माझ्या वाहनाबरोबरच अन्य तीन जणांच्या दुचाकी जळून खाक झाल्या असून ही आग कोणीतरी जाणूनबुजून लावल्याचा संशय महम्मद यांनी व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.