Bondla Wildlife Sanctuary : बोंडला प्राणी संग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

वन मंत्री विश्वजित राणे यांनी ट्वीट करत दिली माहिती
Forest Minister Vishwajit Rane With
Forest Minister Vishwajit Rane With Dainik Gomantak
Published on
Updated on

Bondla Wildlife Sanctuary : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी बोंडला प्राणी संग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे धोरणात्मक आणि संवर्धनात्मत उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. या मास्टर प्लॅनद्वारे योग्य दृष्टीकोनातून सर्वांगीण आणि एकात्मिक विकासाच्या योजना राबवू असे वन मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

Forest Minister Vishwajit Rane With
Akasa Air : अकासाच पहिलं विमान बंगळुरूहून मोपावर लॅन्ड

पुढे ते म्हणाले, मुंबईतील भायखळा प्राणीसंग्रहालयाप्रमाणेच पर्यटक आणि स्थानिक दोघांनाही आकर्षित करणारे एक अनोखे ठिकाण बनवणे हे आमचे ध्येय आहे. प्राणीसंग्रहालयाला सर्वसमावेशक बनवण्यासाठी इतर राज्यांकडून काही प्रजाती घेण्याचा विचार आहे. निसर्ग आणि वास्तुकला यांच्यातील समतोल राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले.

वन्यजीवांसाठी चांगल्या भविष्याच्या दिशेने बोंडला प्राणीसंग्रहालयासाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन बनवण्याबाबत उत्तर विभागाचे उप वनसंरक्षक वन्यजीव आणि पर्यावरण-पर्यटनचे आनंद जाधव, आयएफएस सीसीएफचे सौरव कुमार आणि उत्तर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक व वन्यजीव परेश पोरोब यांच्याशी चर्चा केली. तसेच मी दिल्लीला भेट दिली त्यावेळेला केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडून बोंडलासंबधित मास्टर प्लॅन मंजूर करून घेतला असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.

Forest Minister Vishwajit Rane With
Goa-Nagpur Expressway: गोवा- नागपूर सुपरफास्ट हायवेच्या DPRसाठी तीन निवीदा

गोव्यातील सर्व वन्यजीव अभयारण्यांपैकी बोंडला अभयारण्य हे सर्वात लहान असले तरी, अभयारण्य देखील मुले, कुटुंबे आणि पर्यावरण-पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. फोंडा तालुक्यातील त्याचे सोयीस्कर स्थान आणि त्याचे आटोपशीर आकारमान फक्त 8 चौ. किमी इतके आहे. दिवसाच्या सहलीसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. अभयारण्य येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज आहे.

कसे जाल ?

हे अभयारण्य उत्तर गोव्यातील फोंडा तालुक्यात आहे. पणजी आणि मडगाव या दोन्ही ठिकाणाहून ते सहज उपलब्ध आहे. अभयारण्य पणजीपासून 50 किमी आणि मडगावपासून 38 किमी अंतरावर आहे. खरे तर या दोन्ही ठिकाणांहून अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटक बसेस उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com