Goa-Nagpur Expressway: गोवा- नागपूर सुपरफास्ट हायवेच्या DPRसाठी तीन निवीदा

760 किलोमीटर लांबीचा महामार्ग 12 जिल्ह्यांना जोडणार
Nagpur-Goa Expressway
Nagpur-Goa ExpresswayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Nagpur Expressway: गोवा- नागपूर या 760 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेचा 'डीपीआर' तयार करण्यासाठी 3 कंपन्यांकडून निवीदा आल्या आहेत. एल. एन. मालविया इन्फ्रा, मोनार्क सर्वेयर्स आणि टीपीएफ इंजिनियरिंग या 3 कंपन्यांचा समावेश आहे.

Nagpur-Goa Expressway
Mahadayi Water Dispute: ...म्हणून अमित शहांच्या भेटीला विरोधकांना बोलावले नाही

राज्य रस्ते विकास महामंडळानं गोवा- नागपूर या 760 किलोमीटर लांबीचा 'ग्रीन फिल्ड सुपरफास्ट' महामार्गाच्या डीपीआरसाठी निविदा मागवल्या होत्या. या महामार्गाचे नाव 'महाराष्ट्र शक्तीपीठ एक्स्प्रेसवे' ठेवण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गासाठी 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे नागपूर–गोवा अंतर फक्त आठ तासांत पार करता येणार आहे.

Nagpur-Goa Expressway
Goa Assembly Winter Session: अधिवेशन काळात जमाबवंदीचे आदेश; पाच लोकांना एकत्र येण्यास बंदी

समृद्धी महामार्गाच्या अतंर्गत नागपूर – गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार आहे तर सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे. वर्धा येथून हा मार्ग समृद्धी महामार्गाद्वारे नागपूरला जोडण्यात येणार आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. एकूणच हा मार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bageshwar Dham Sarkar Controversial Statement
Goa Floating Library
Supreme Court highway safety guidelines
Garbage dumping on Varunapuri to Shantinagar road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com