Goa Police : गोव्यातील लोकसंख्या पाहिल्यास राज्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण बरेच मोठे आहे. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असून त्यासाठी व्यापक मोहीम हातात घेतली जाईल.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर करण्यासाठी भविष्यात स्वयंचलित उपकरणांचा वापर करण्याच्या पर्यायाचीही शक्यता पडताळून पाहणार आहोत, असे महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले.
गोव्यात जानेवारी महिन्यात 30 जणांना अपघाती मृत्यू आले. फेब्रुवारीतही बरेच अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज महासंचालकांनी दक्षिण गोव्यातील वाहतूक पोलिस आणि विभागीय उपअधीक्षक यांच्याबरोबर बैठक घेतली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक टिपणारे कॅमेरे बसविण्याचा पर्याय सरकारला खात्याने सुचविला आहे, असे सिंग यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका
राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण यावे यासाठी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर तसेच हेल्मेट आणि सीटबेल्ट न घालता वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
गोव्यात यापुढे जी-20च्या परिषदा होणार आहेत. त्यासंबंधीच्या सुरक्षेबद्दल कोणते उपाय घेतले जाणार असे विचारले असता त्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांबरोबर नियमित बैठका चालू असतात, अशी माहिती सिंग यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.