Goa Environment: कदंब पठारावर डोंगर कापणीप्रकरणी नोटीस बजावणार -विश्‍वजित राणे

मंत्री विश्‍वजित राणे यांनी नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत कदंब पठाराची पाहणी केली.
Mountain Harvest |Goa Environment
Mountain Harvest |Goa EnvironmentDainik Gomanatk

Mountain Harvest: कदंब पठारावर व्ही टू मॉलच्या बाजूला केलेल्या डोंगर कापणीबद्दल आरटीआय कार्यकर्ते ॲड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसार माध्यमावर माहिती दिली. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाने देखील यासंदर्भात नगर नियोजन खात्यात तक्रार केली होती.

याची दखल घेत नगर नियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. नियम धाब्यावर बसून सर्रासपणे डोंगर कापणी केली गेली असून जमिनीच्या मालकाला नोटीस बजावली जाईल.

कदंब पठारावरील एक किलोमीटर उतार ना विकास क्षेत्र (एनडीझेड) केला जाईल, असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

राणे यांनी मुख्य नगर नियोजक राजेश नाईक आणि इतर अधिकाऱ्यांसोबत यांनी पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, या ठिकाणी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कारणे दाखवा आणि काम थांबवा नोटीस बजावणार आहोत,

Mountain Harvest |Goa Environment
Environment Council: गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद

तसेच देण्यात आलेल्या परवानग्या रद्द केल्या जातील. कदंब पठारावरील एक किलोमीटर उतार असलेली जमीन एनडीझेड जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी पुढील नगर नियोजन मंडळाच्या बैठकीत फाईल मांडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com