Environment Council गोव्यात तीन दिवशीय पहिली आंतरराष्ट्रीय पर्यावरण व शाश्वत परिषद 2 ते 4 फेब्रुवारीला ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोवा प्रदूषण मंडळाने सीसीआय, सीएसआयआर, निरी, जीआरआय व रिडियल कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजत करण्यात आली आहे.
या परिषदेवेळी जागतिक पाणथळ दिनही साजरा केला जाणार आहे. कुडचडे येथील नंदा तळे येथून पाणथळ बचाव मोहिमेला सुरुवात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तर समारोपाला पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल म्हणाले, या परिषदेला देश विदेशातून सुमारे 300 प्रतिनिधी उपस्थिती लावणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक तसेच विविध कंपन्यांचे उच्चपदावरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सुमारे 200 विदेशी प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे, तर देशातील सुमारे 100 प्रतिनिधींचा समावेश असेल.
या विदेशी तज्ज्ञ व संशोधकामध्ये सुमारे 60 ते 70 वक्ते असतील. यावेळी विविध कंपन्यांची सुमारे 50 दालनेही असतील. या तीन दिवशीय परिषदेच्या काळात विविध विषयांवर पॅनलवार चर्चा होणार आहे.
परिषदेच्या तिसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात जागतिक पाणथळ दिन 2023 निमित्त राष्ट्रीय स्तरावर नंदा तळे याचे केंद्रीयमंत्री भूपेंदर यादव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जगामध्ये निवड आलेल्या रामसर साईटमध्ये कुडचडे येथील या नंदा तळ्याचा समावेश करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम कुडचडे येथील रवींद्र भवन येथे होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी परिषदेच्या समारोप कार्यक्रमांत केंद्रीयमंत्री मार्गदर्शन करणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, सदस्य सचिव शमिला मोंतेरो तसेच गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्यसचिव डॉ. प्रदीप सरमोकादम उपस्थित होते.
प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले, पर्यावरण व शाश्वताबाबत ही परिषद असून देश विदेशातील मोठ्या उद्योग कंपन्यांचे तज्ज्ञ तसेच व्यवस्थापकीय संचालक यामध्ये भाग घेणार आहेत. या परिषदेमध्ये स्टेडियममध्ये भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 50 कंपन्यांचा समावेश असेल. या परिषदेवेळी तीन समझोता करार (एमओयू) होणार आहेत.
कुडचडे ते राय रॅली
जागतिक पातळीवर निवडण्यात आलेल्या देशातील पाणथळाच्या 75 रामसर साईटचे 23 राज्यातील व्यवस्थापक उपस्थिती लावणार आहेत. येत्या 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन आहे.
त्यानिमित्त कुडचडे ते राय अशी रॅलीही काढली जाणार आहे. पाणथळ बचाव हा संदेश यावेळी दिला जाणार आहे, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे सदस्यसचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.