Goa Election: वाळपई मतदार संघ सोडून मी कुठेच जाणार नाही;विश्वजीत राणे

नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित सभेत येथील शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात ते बोलत होते.
Goa Election: वाळपई मतदार संघ सोडून मी कुठेच जाणार नाही;विश्वजीत राणे
Goa Election: वाळपई मतदार संघ सोडून मी कुठेच जाणार नाही;विश्वजीत राणेDainik Gomantak
Published on
Updated on

गुळेली: जे कोण माझ्या विरोधात अपप्रचार करतात त्यांना मी सांगू इच्छितो की वाळपई मतदार संघ सोडून मी कुठेच जाणार नाही असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी नगरगाव सत्तरी येथे केले. नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित सभेत येथील शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात ते बोलत होते.

शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे बोलत होते
शांतादुर्गा देवस्थानच्या सभागृहात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे बोलत होते Dainik Gomantak

काॅंग्रेस पक्षावर टिकास्त्र सोडताना विश्वजित राणे म्हणाले की साहेबांनी 21 वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले व सत्तरीचा व गोव्याचा विकास साधला पण दिल्ली वरुन येणाऱ्या काॅंग्रेस नेत्यांना साहेबांना येऊन भेटण्यास वेळ नाही अशा काॅंग्रेस पक्षाला हद्दपार करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस राजकारणील जेष्ठ अशा साहेबांना भेटायला त्यांचा आशीर्वाद घेतात साहेबांनी काॅंग्रेसला जे काही कळवायचे ते कळवले आहे. गोव्याच्या व सत्तरीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. युवक व महिलांच्या विकासासाठी सरकार व आपण कटिबद्ध आहोत त्यादृष्टीने आपले व सरकारचे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान व केंद्राच्या योजना सर्वापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Goa Election: वाळपई मतदार संघ सोडून मी कुठेच जाणार नाही;विश्वजीत राणे
Goa: जिल्हास्तरीय निर्यातदारांच्या मेळाव्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद

सत्तरीत आणि एकूणच गोव्यात पंचायतीला सुद्धा निवडून येण्याची जांची कुवत नाही ते राजकारण करू पाहतात आम्ही सदैव लोकात असतो मग तो कोवीड काळ असू किंवा पूर स्थिती असू. दिल्लीतील लोकांनी गोव्यात येऊन गोवेकरांना भडकवण्याचा प्रयत्न करु नये असे ते म्हणाले. कोविडकाळात गोवाराज्य हे पहिले राज्य आहे जे लोकांना मोफत औषधोपचार उपलब्ध केले आहेत. सरकारच्या माद्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्यप्रमाणात औषधोपचार करण्यास प्रत्येक रुग्णामागे एक लाख रुपये खर्च झालेला आहे. सरकराने कोविड कसा हाताळला व लोकांसरकारला दोन प्रमाणात विषय मांडावा लागतो.असे ते म्हणाले उपसरपंच समिक्षा सालेलकर, लक्ष्मी हरवळकर, रामा खरवत, पराग खाडीलकर, लक्ष्मण गावस, सरपंच प्रशांत मराठे ,विनोदी शिंदे प्रसाद खाडीलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते

Dainik Gomantak

यावेळी बोलताना सरपंच प्रशांत मराठे म्हणाले की आॅंप्टीकल फायबर घालून सर्व गाव जोडणार असल्याची माहिती यांनी दिली. यावेळी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य सौ. राजर्षी काळे यांनी आपले विचार मांडले. सर्वांनी अभिजीत राणे यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी सरपंच पराग खाडीलकर यांनी कोविड काळात आरोग्य मंत्र्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गोव्यातील जनतेचे रक्षण केले. त्याचबरोबर पूर काळात स्वतः जातीने लक्ष देऊन पूरग्रस्तांना मानसिक व आर्थिक पाठबळ दिले. त्याचबरोबर त्यांचं इतर वेळीही मतदारसंघावर लक्ष असतं. पंच लक्ष्मण गावस म्हणाले की सत्तरीच्या जनतेला याप्रकारचा लोकनेता लाभणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरीचा विकास होत असून यापुढेही होणार आहे. पंच लक्ष्मी हरवळकर म्हणाल्या की युवकांचा विकास करण्यासाठी आमचे आमदार कार्यरत आहेत. महिलांसाठी स्वयंसहाय्य गटाच्या माद्यमांतून सरकरातर्फे आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य गेली कित्येक वर्षे आमचे आमदार करत आहेत. युवकांचा व महिलांचा विकास करण्यास आमचे आमदार सदैव तयार आहेत व राहणार असा विश्वास वाटतो. नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com