"मी त्यांच्यासमोर सामान्य नेता", आरोग्यमंत्री राणेंचे आवडते मुख्यमंत्री कोण? Watch Video

Vishwajit Rane Interview: या मुलाखतीत त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पर्याय वगळता, देशातील तीन आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajeet Rane's Favourite Chief Minister: गोव्याचे नावाजलेले मंत्री आणि वाळपईचे आमदार विश्वजीत राणे सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीत त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पर्याय वगळता, देशातील तीन आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर राणे यांनी दिलेले उत्तर खूप गाजले आहे.

हिमांता बिस्वा यांची आक्रमकता भावली

राणे यांना मुलाखतकार शुभंकर मिश्रा यांनी गोव्याचे मुख्यमंत्री सोडून इतर मुख्यमंत्र्यांबद्दल विचारले. यावर राणे यांनी नेत्यांची तुलना करता येत नसली तरी, काही नेत्यांचे विशेष गुणधर्म आवडत असल्याचे सांगितले. त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा यांचे काम विशेष आवडत असल्याचे नमूद केले.हिमांता बिस्वा यांचे वागणे, नेतृत्व करण्याची क्षमता आणि त्यांची आक्रमक शैली आपल्याला अधिक भावते, असे मंत्री राणे म्हणाले.

Vishwajit Rane
Vishwajeet Rane: रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज

देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक

यासोबतच, राणे यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. फडणवीस हे उत्तम प्रशासक असून, त्यांची मेहनत करण्याची तयारी आवडत असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

"मी त्यांच्यासमोर सामान्य नेता"

विश्वजीत राणे यांनी या सर्व नेत्यांकडून आपल्याला कायमच प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या नेत्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि त्यांच्यासमोर मी एक सामान्य नेता असल्याचा उल्लेखही राणे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com