4 वर्षांपूर्वी उद्‌घाटन; तरीही कांदोळीतील उद्यान उघडेना!

स्‍थानिक आणि पर्यटकांना विसावा घेण्यासाठी शोधाव्‍या लागत आहेत जागा
Candolim Beach
Candolim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्‍यातील कांदोळी, कळंगुट किनारे देश-विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. सध्या या किनाऱ्यांवर विदेशी पर्यटक दिसत नसले तरी देशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. कांदोळी किनारपट्टी परिसरात चार वर्षापूर्वी उद्यान उभारण्यात आले. मात्र ते अद्यापही बंद असल्‍याने स्‍थानिक आणि पर्यटकांना विसावा घेण्यासाठी जागा शोधाव्‍या लागत आहेत. सिकेरी येथील सेंट लॉरेन्‍स चर्च परिसरात जिल्‍हा पंचायत निधीतून उद्यान उभारण्यात आले. काही वर्षांपूर्वी याचे उद्‌घाटनही झाले. तत्‍कालीन जिल्‍हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाबोळकर यांच्‍या निधीतून या उद्यानाची उभारणी करण्यात आली होती. या उद्यानात जॉगिंग पार्कचीही सोय आहे.

Candolim Beach
गोव्यातील पंचायत आणि मॉन्सूनपूर्व कामांचा वरचेवरच बोलबाला

हे उद्यान सेंट लॉरेन्‍स चर्चच्‍या जागेत उभारण्यात आले आहे. पण चर्च समिती आणि पंचायत यांच्‍यात मतभिन्नता झाल्‍याने या उद्यानाचे अद्यापही उद्‌घाटन झालेले नाही. उद्यानाच्‍या देखभालीसाठी आणि चालविण्यासाठी समितीने ते पंचायतीकडे सोपवणे आवश्‍यक आहे. मात्र असे न झाल्‍याने उद्यान सुरू होत नसल्‍याची माहिती स्‍थानिकांनी दिली.

पार्क सुरू केल्‍यास याचा फायदा स्‍थानिकांसह पर्यटकांनाही होईल, अशी प्रतिक्रिया येथील हॉटेल व्‍यावसायिक प्रशांत मोरजकर व्‍यक्‍त केली. पार्क बंदच ठेवायचे होते तर ते बांधले कशाला, असा सवालही त्‍यांनी केला.

कांदोळीतील प्रकार

कांदोळी किनाऱ्यावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. लहान मुलांना खेळण्यासाठी तेथे चिल्‍ड्रन पार्क बांधण्यात आले. चार वर्षापूर्वी तत्‍कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्‍या हस्‍ते या पार्कचे उद्‌घाटन करण्यात आले होते. रंगमंचही उभारण्यात आला आहे. पण उद्‌घाटन झाल्‍यापासून हे पार्क अजूनही बंदच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com