Vishwajeet Rane
Vishwajeet RaneGomantak Digital Team

Town And Country Planning Department : जबाबदारी पेलता येत नसेल तर खाते सोडावे : सबिना मार्टिन्स

राणेंना सल्ला : कायद्यानुसार आराखडा तयार करा!

नगरनियोजन कायद्याच्या तरतुदीनुसार राज्याच्या जमीन वापरासाठी प्रादेशिक आराखडा तयार करणे बंधनकारक आहे आणि नगरनियोजन मंत्री त्यापासून दूर जाऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया गोवा बचाव आंदोलनाच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी व्यक्त केली.

प्रादेशिक आराखडा हा मोठा घोळ असून यापुढे असा आराखडा तयार केला जाणार नाही. यापुढे फक्त झोनिंग विभाग असतील अशी प्रतिक्रीया नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली होती. त्यावर मार्टिन्स म्हणाल्या, आम्ही संविधान पाळतो आणि या संविधानानुसार हे कायदे तयार झाले आहेत, याची आठवण मंत्र्यांनी ठेवावी.

Vishwajeet Rane
Goa Schools Reopen: शाळेचा पहिला दिवस! किलबिलाट आणि गजबजाट; असह्य उकाड्यातही विद्यालये गजबजली

मार्टिन्स पुढे म्हणाल्या, उद्या संख्याबळ नाही म्हणून सरकार निवडणुका घेणार नाही असे म्हणू शकेल का? या तर्कानुसार मतदान होणार नाही आणि राज्य चालवण्यासाठी एक व्यक्ती मंत्रिमंडळ नियुक्त करेल. लोकशाहीला हे फक्त मान्य नाही. आम्ही संविधान आणि त्यावर आधारित कायदे पाळतो याची जाणीव मंत्री राणे यांनी ठेवण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

Vishwajeet Rane
Goa Crime News : पिळर्ण येथे आढळले एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक

प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल!

मार्टिन्स म्हणाल्या, मंत्री प्रादेशिक आराखडा रद्द करू शकत नाहीत. हा आराखडा राज्य आणि तेथील लोकांसाठी बनवलेला आहे, काही मोजक्याच विशेषाधिकारप्राप्त व्यक्तींसाठी नाही. ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. मंत्र्यांना या प्रक्रियेचे पालन करावेच लागेल. जर मंत्री आपली कर्तव्ये पार पाडू शकत नसतील तर त्यांनी या खात्याचा कार्यभार सोडावा, अशी मागणी त्यांनी केली.

Vishwajeet Rane
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीमध्ये दरवाढ, दक्षिण गोव्यात दर स्थिर; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

मंत्री राणे यांची ही भूमिका म्हणजे फुफाट्यातून आगीत टाकण्यासारखे होईल. दीर्घकालीन नियोजनाचा अधिकाऱ्यांनी गैरवापर केला. आता या अल्पकालीन झोनिंग योजना गोव्याला पूर्णतः संपवून टाकतील. अशा विनाशकारी योजनांना आताच खंबीरपणे विरोध केला नाही तर गोव्याचे अस्तित्व धोक्यात येईल.

ॲड. क्लिओफात आल्मेदा, सदस्य, गोवा बचाव आंदोलन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com