Goa Schools Reopen: शाळेचा पहिला दिवस! किलबिलाट आणि गजबजाट; असह्य उकाड्यातही विद्यालये गजबजली

नवीन शैक्षणिक वर्षाला काल दि. ५ जूनपासून प्रारंभ झाला. शाळांची घंटा एकदाची वाजली.
Goa Schools Reopen
Goa Schools ReopenDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन शैक्षणिक वर्षाला काल दि. ५ जूनपासून प्रारंभ झाला. शाळांची घंटा एकदाची वाजली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात राज्‍यासह डिचोलीतही या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साहात झाला.

शाळेचा पहिला दिवस म्हटल्याबरोबर डिचोली शहरासह परिसरातील शाळांनी मुलांचा किलबिलाट सुरू झाला. पालकांचीही धावपळ दिसून आली. बहुतांश शाळांनी ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एका बाजूने शाळांची घंटा वाजल्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूने असह्य उकाडा.

यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही हैराण झालेले दिसले. पहिलाच दिवस असल्याने आज शाळा लवकर सोडण्यात आल्या. दरम्यान, पाऊस सक्रिय होईपर्यंत शाळा लवकर सोडाव्यात किंवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Goa Schools Reopen
World Environment Day : पर्यावरणाप्रती सजग राहण्याची वेळ; चोडण एज्युकेशन सोसायटीतर्फे पर्यावरण दिन साजरा

सगळीकडे गडबड, गोंधळ

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला त्यांचे पालक सोबत आले होते. त्यामुळे शहरातील सर्व शाळांजवळ विद्यार्थ्यांसह पालकांचा गजबजाट ऐकू येत होता. शहरातील श्री शांतादुर्गा आणि अवर लेडी हायस्कूलजवळ तर मोठी गर्दी दिसून आली.

इयत्ता पहिलीत आणि नवीन शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्याची कोणत्या वर्गात व्यवस्था करण्यात आली आहे, त्याची शोधाशोध करताना दिसले. मुलांसमवेत वर्गात प्रवेश करताना पालकांनी आपापल्या पाल्यांना शुभेच्छा दिल्या. शाळा सुटण्यावेळी पुन्हा पालक आपल्या पाल्यांना घरी नेण्यासाठी आले होते. त्‍यामुळे शाळेचा पहिला दिवस गडबड आणि गोंधळातच गेला.

उष्‍म्‍यामुळे शाळा लवकर सोडण्‍याची मागणी

यंदा हवामानात कमालीचा बदल होताना उष्णतेने कहर केला आहे. उकाडा असह्य होत आहे. प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी उमेदीने शाळेत आले होते. मात्र उकाड्याने ते त्रस्त झाल्याचे दिसून आले. उकाडा असह्य होत असल्याने पालकही काळजीत आहेत.

पाऊस सक्रिय होईपर्यंत एकतर शाळा लवकर म्हणजे दुपारपूर्वी सोडाव्यात किंवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी डॉ. कौस्तुभ पाटणेकर, समीर वायंगणकर आदी पालकांकडून करण्यात आली.

शाळेत विद्यार्थ्यांचे उत्‍साहात स्वागत

नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजल्याने कमालीचा उत्साह दिसून येत होता. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. घंटा वाजल्यानंतर प्रत्येक शाळांनी प्रार्थना झाली आणि नंतर प्रत्येक वर्गात किलबिलाट सुरू झाला. वर्गात जागेवर बसवणे तसेच वह्या, पुस्तके आदी शालेय साहित्याची यादी देण्यातच शाळेचा पहिला दिवस गेला.

जुने मित्र भेटले एकमेकांना

काल शाळेत प्रवेश केल्यानंतर जुने विद्यार्थिमित्र एकमेकांना भेटले. गप्पागोष्टीही केल्या. मित्र भेटल्याचा आनंद त्‍यांच्‍या चेहऱ्यावर दिसत होता. गेल्या दोन महिन्यांत त्‍यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. पहिल्याच दिवशी आज शाळेत शिकवणी घेण्यात आली नसली तरी जुने मित्र भेटल्याचा आनंद वेगळाच होता, असे अनुज सावंत या विद्यार्थ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com