Goa Ganesh Chaturthi 2023: पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप

Goa Ganesh Chaturthi 2023: सर्वत्र मोरयाचा जयघोष : राज्यात फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुकांनी परिसर गजबजले
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: राज्याच्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या चतुर्थीमधील पाचवा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची मोठी परंपरा राज्यभर आहे. त्यानुसार शनिवारी (ता.२३) सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी व गणपती बाप्पाचा जयघोष करत मिरवणुकीने पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला.

Goa Ganesh Chaturthi 2023
Ramesh Tawadkar: आरोग्य क्षेत्रात डेन्मार्क करणार गुंतवणूक

गणरायाला अनंत चतुर्दशीपर्यंत निरोप देण्याची प्रथा असली तरी गौरी-गणपतींना एकत्रित जेवण घालून पाचव्या दिवशी बहुतांश घरगुती गणपतींना निरोप देण्यात येतो. त्याप्रमाणे राज्यभर शनिवारी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, या जयघोषात यथासांग पूजेनंतर मिरवणुकीने निरोप देण्यात आला.

मांडवी, झुआरी नदीसह मिरामार किनाऱ्यावर आणि खोल अरबी समुद्रात गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पणजीत अनेक ठिकाणी गल्लीच्या, वाड्यावरच्या एकत्र गणपतींची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. पणजीच्या फेरीबोटीच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विशेष लायटिंग मंडप उभारण्यात आला आहे.

याठिकाणी आरती आणि पूजा करून फेरीबोटीने मांडवीच्या मध्यावर नेऊन बाप्पाला निरोप देण्यात आला. तर मिरामारच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन केले.

मोरजी पंचायत क्षेत्रातील एकूण ९९ टक्के घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. काही जणांनी नारोजीवाडा येथील शापोरा नदीकिनारी तर काही जणांनी तेंबवाडा, विठ्ठलदास वाडा, गावडेवाडा या समुद्रकिनाऱ्यांवर पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले.

विसर्जनस्थळी पोलिस बंदोबस्त

राज्य उत्सव म्हणून राज्यात गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. गोव्यात घरगुती आणि सार्वजनिक आशा दोन्ही पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने, जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो.

प्रामुख्याने घरगुती गणपती दीड किंवा पाच  दिवसांत विसर्जन करण्याची प्रथा असून सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत  तर काही ठिकाणी एकवीस दिवस पुजले जातात.

गणपतीबरोबर गौरी पूजनाला मोठे महत्त्व असून अनेक ठिकाणी एकत्र पूजा करूनच एकत्र गौरी-गणपती विसर्जन केले जाते.

रात्री उशिरापर्यंत गणपतींचे विसर्जन सुरू होते. यासाठी  गोवा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Goa Ganesh Chaturthi 2023
Ghumt Musical Instrument: घुमटाला लवकरच मिळणार ‘जीआय’

नवीन वाटांचा वापर

किनारा म्हटल्यानंतर पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता आणि अनेक पारंपरिक पायवाटा ज्यात गणपती नेण्याच्याही वाटा होत्या. त्या वाटा अरुंद तर काही ठिकाणी कायमच्याच बंद करण्याचाही प्रकार घडल्यामुळे अनेक नागरिकांना यंदा नवीन वाटेमधून गणपतीला विसर्जनस्थळी न्यावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com