Ramesh Tawadkar: आरोग्य क्षेत्रात डेन्मार्क करणार गुंतवणूक

Ramesh Tawadkar: रमेश तवडकर : डेन्मार्कच्या राजदूतांनी घेतली सभापती, मुख्यमंत्र्यांची भेट
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Ramesh Tawadkar: जगभरात डेअरी, आरोग्य तसेच मत्स्योद्योगात प्रसिद्ध असणाऱ्या डेन्मार्कने भारताबरोबर गोव्यात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. डेन्मार्कच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गोव्यात वापर होणार असल्याने राज्याला त्याचा मोठा फायदा मिळेल, असा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

Ramesh Tawadkar
Goa Ganesh Chaturthi 2023: म्हापसा गणेशोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर व मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची भेट घेतली. या दरम्यान सायंकाळी स्वॅन यांनी गोवा विधानसभेचीही पाहणी केली.

सभापती तवडकर म्हणाले, डेन्मार्कने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दीर्घकाळ टिकणाऱ्या दुग्ध पदार्थांची निर्मिती केली आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान गोव्यातील शेतकरी, उद्योजकांना देण्याची तयारी डेन्मार्कने दर्शवली आहे.

आज ‘श्रम-धाम’ला भेट

उद्या २४ रोजी संध्याकाळी श्रीस्थळ येथील वन खात्याच्या विश्रामगृहात श्रम-धाम संकल्पनेतून साकारलेल्या घरांचे सादरीकरण आणि प्रमुख ५० कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यानंतर या संकल्पनेतून उभारलेल्या अर्धफोंड येथील हरिश्चंद्र नाईक, तारीर येथील प्रीती, आगोंद काराशीरमळ येथील विनंती वेळीप आणि धवळखाजन येथील सुजाता पागी यांच्या घरांना फ्रेडी स्वॅन भेट देणार आहेत.

Ramesh Tawadkar
CM Pramod sawant: संघटनात्मक नेतृत्वाच्या परीक्षेतही मुख्यमंत्री पास

गोव्यासह भागीदारीची डेन्मार्कची तयारी

डेन्मार्कने विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. डेन्मार्कच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गोव्याला फायदा करून देण्याबाबत डेन्मार्क सरकार तयार आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा झालेली आहे, असे डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन म्हणाले. पर्यटनाच्या बाबतीत गोवा अग्रेसर आहे. कोविड काळात डेन्मार्कमधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती, पण पुढील काळात गोव्यातील पर्यटक वाढवण्याच्या दृष्टीनेही आमचे प्रयत्न असतील, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com