Virdi Dam
Virdi Dam Dainik Gomantak

Virdi Dam Dispute: महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम बंद; गोवा सरकारने नोटीसीद्वारे केला होता विरोध

गोव्याच्या जलस्त्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी
Published on

Virdi Dam Dispute: महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाकडून दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे बेकायदा धरण प्रकल्प उभारण्यास सुरवात करण्यात आली होती. ही बाब समोर येताच, गोवा सरकारने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून हे काम बंद करण्यास सांगितले होते.

त्यानंतर आता महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम बंद केल्याची माहिती, गोव्याच्या जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी दिली आहे. मंगळवारी आपण स्वतः येथे पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडूनही विर्डी येथे वाळवंटी नदीवर पाच ठिकाणी छोटे बंधारे आणि धरण प्रकल्प उभारून पाणी वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम तातडीने थांबवावे अशी सूचना करणारी नोटीस गोवा सरकारने महाराष्‍ट्राला पाठविली होती. .

केंद्रीय जलविवाद लवादाने 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारला 1.33 टीएमसी पाणी नदीपरिक्षेत्रात (बेसीन) वापरण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी केंद्रीय जलआयोग, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. या परवानग्या नसतानाच बांधकामाला सुरूवात केल्यामुळे गोवा सरकारने ही नोटीस पाठविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com