Viral Video: रमाकांत खलप, चीन आणि लोकशाही; प्रमोद महाजनांचा 28 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडुकीत रमाकांत खलप यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला.
Ramakant Khalap And Pramod Mahajan
Ramakant Khalap And Pramod MahajanDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video

लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते रमाकांत खलप यांना पराभव पत्कारावा लागला. भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने त्यांचा पराभव केला. श्रीपाद नाईक सहग सहाव्यांदा उत्तर गोव्याचे संसदेत नेतृत्व करतील.

रमाकांत खलप विजय मिळवतील अशी आशा असलेल्या काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. पण, खलपांचा 1996 साली मंत्री असतानाचा एक किस्सा सध्या दिवंगत प्रमोद महाजन यांनी संसदेत कथन केला, याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

रमाकांत खलप यांनी 1996 साली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. खलप यांनी कासार शिवराम यांचा दहा हजार मतांनी पराभव केला. केंद्रातील भाजप सरकार अल्पमतात आल्यानंतर एच. डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आय. के. गुजराल हे पंतप्रधानपदी विराजमान झाले.

याच सरकारमध्ये रमाकांत खलप यांच्याकडे कायदा आणि न्यायपालिका राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रमाकांत खलप यांचा पराभव झाल्यानंतर प्रमोद महाजन यांचे 28 वर्षापूर्वीचे संसदेतील भाषण चांगलेच व्हायरल होत आहे.

Ramakant Khalap And Pramod Mahajan
Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

काय आहे व्हिडिओ

प्रमोद महाजन अविश्वास ठरावाविरोधात संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली चीन दौऱ्यावेळी घडलेल्या एक किस्सा सभागृहात सांगितला.

प्रमोद महाजन म्हणाले आम्ही रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली एका संसदीय दौऱ्यासाठी चीनला गेलो होतो. यावेळी येथील लोकांनी भारतातील लोकशाही चालते कशी अशी विचारणा केली. त्यावर मी सांगतो तुम्हाला कळेल.

"मी प्रमोद महाजन आणि मी देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा संसद सदस्य आहे पण सध्या विरोधी पक्षात आहे. त्यानंतर खासदार चिंतामण यांच्याकडे हात करत ते दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य असून, ते सरकारच्या बाहेर आहेत पण, त्यांनी सरकारला समर्थन दिले आहे. त्यानंतर आणखी एका नेत्याकडे हात दाखवत ते फ्रन्टमध्ये आहेत पण सरकारमध्ये नाहीत."

त्यानंतर शेवटी रमाकांत खलप यांच्याकडे हात करत, "ते एकच त्यांच्या पक्षाचे खासदार आहेत पण ते सरकारमध्ये आहेत," असे महाजन म्हणाले. प्रमोद महाजन यांच्या या किस्साने सभागृहात सर्वत्र हाशा पिकला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडुकीत रमाकांत खलप यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला. त्यानंतर खलप यांचे उदाहरण दिलेला प्रमोद महाजन यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे रमाकांत खलप यांनी प्रमोद महाजन यांच्या सभागृहातील त्यांच्या भाषणाबद्दल त्यांचे कौतुक देखील केले असून, याबाबतचे अभिनंदन पत्र उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com