Murdi Khandepar News: मुर्डी खांडेपार येथील बंधाऱ्याला विरोधासाठी ग्रामस्थांची थेट पंचायतीवर धडक

ना हरकत दाखला दिला नसल्याचे पंचायतीकडून स्पष्टीकरण
Murdi Khandepar Villagers Protest
Murdi Khandepar Villagers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Murdi Khandepar News: मुर्डी खांडेपार येथील बंधाऱ्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रशासनाकडून येथे कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली होती. तथापि, याविरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज, गुरूवारी थेट मुर्डी खांडेपार पंचायतीला धडक दिली.

Murdi Khandepar Villagers Protest
President Draupadi Murmu Goa Visit: ताफा थांबवून राष्ट्रपती रमल्या विद्यार्थ्यांमध्ये; साधेपणाने भारावले विद्यार्थी

या वेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी आपली बाजू पंचायतीसमोर मांडली. तेव्हा पंचायतीकडून ना हरकत दाखला दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. जमावबंदी लागू करून येथे बंधाऱ्याचे काम सुरू केले गेले आहे, असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

जिथे काम सुरू आहे, प्रत्यक्ष तिथेही जाण्याचा ग्रामस्थांचा मानस होता, पण आज तरी तिथे जाण्याचे टाळले आहे.

दरम्यान, मुर्डी खांडेपार या भागात देवदेवतांती मांदियाळी आहे. या भागात कलम 144 लागू करून अशांतता, दहशत माजविण्याचा प्रकार होत आहे. याचा निषेध करत असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Murdi Khandepar Villagers Protest
Banastari Bridge Accident: बाणस्तारी मर्सडीज अपघातातील कारचालक परेश सावर्डेकर याला सशर्त जामिन

मुर्डी-खांडेपार बंधाऱ्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. बंधाऱ्याला लोकांचा ठाम विरोध असतानाही अशा प्रकारचा निर्णय ऐन श्रावण महिन्यात सरकारने घेतला आहे.

विशेष म्हणजे स्थानिक आमदार आणि कृषी मंत्री रवी नाईक यांनाही येथील जमावबंदीबाबत काहीही माहिती नव्हती. ज्येष्ठ मंत्र्यांना सरकार विश्वासात घेत नाही, असे आम्ही समजायचे का, असे भाटीकर म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात मुर्डी-खांडेपार भागातील काही लोक बेघर झाले होते. त्यावेळी मगो पक्षामार्फत मदतकार्य केले. काहीची घरे बांधून दिली. बंधारा बांधल्यावर त्या लोकांना महापुराचा फटका बसेल, असे भाटीकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com