Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak

Banastari Bridge Accident: बाणस्तारी मर्सडीज अपघातातील कारचालक परेश सावर्डेकर याला सशर्त जामिन

सरकारी वकीलांच्या निवेदनानंतर न्यायालयाकडून जामिन मंजूर
Published on

Banastari Bridge Accident: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सिडीजच्या अपघातातील कारचालक परेश सावर्डेकर याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडीपीठाने जामिन मंजूर केला आहे. वैयक्तिक एक लाख रूपयांच्या हमीवर सशर्त हा जामिन मंजूर करण्यात आला आहे.

Banastarim Bridge Accident
President Draupadi Murmu Goa Visit: ताफा थांबवून राष्ट्रपती रमल्या विद्यार्थ्यांमध्ये; साधेपणाने भारावले विद्यार्थी

हा अपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून परेश कोठडीत होता. त्याची चौकशी केली जात होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या परेशकडून पोलिसांनी जितकी हवी तितकी माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा बहुतांश तपास पूर्ण होत आला आहे.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक जखमी महिला वनिता भंडारी आता सुमारे आठ महिने अंथरूणाला खिळून असणार आहे. आणखी एक जखमी झालेल्या वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तर आणखी एक जखमी युवकाला डिस्चार्ज दिला गेला आहे.

सुमारे 18 दिवसांच्या कोठडीमध्ये परेशकडून सर्व माहिती घेतली गेली आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे निवेदन सरकारी वकीलांनी खंडपीठाकडे केले. त्यावर न्यायालयाने परेश याला जामिन मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com