Goa Mining : जीव गेला तरी बेहत्तर; पण खाण सुरू करू देणार नाही! कावरेत भूमिपुत्रांचा निर्धार

जनसुनावणीसही विरोध
Qupem News
Qupem NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कावरे येथील देवापान्न डोंगरावर प्रस्तावित मँगनिज खाणीला कावरे गावातील भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शविला असून कोणत्याही स्थितीत खाण सुरू होऊ देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जीव गेला तरी बेहत्तर, पण कावरेत खाण सुरू करू देणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कावरेतील देवापान्न डोंगरावर खनिज खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने येथील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांना विश्वासात न घेताच खाणीचे सीमांकन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Qupem News
Panaji Smart City Work : स्‍मार्ट सिटी मार्चची डेडलाईन उलटली, आता जूनचा वायदा

या खाणीविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव संमत केला असून आता 11 रोजी जनसुनावणी होणार आहे. या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात गेले आहेत. कावरे गावात या खाणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.

11रोजी यासंदर्भात जनसुनावणी होणार असून त्यावेळी या खाणीच्या विरोध दर्शविण्यात येईल. कोणत्याही स्थितीत ही खाण सुरू होऊ देणार नसल्याचे सत्यवती वेळीप यांनी सांगितले. या डोंगर माथ्यावर आमच्या काजू बागायती असून खाली शेतजमीन आहे. हेच आमचे उपजीविकेचे साधन आहे. ही खाण सुरू झाल्यास आमचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देवस्थान, जलस्रोत नष्ट होणार

पावसाळ्यात येथे भात शेती तसेच उन्हाळ्यात भाजी, मिरचीची लागवड केली जाते, असे रती वेळीप यांनी सांगितले. देवापान्न डोंगराखाली आमचे जागृत देवस्थान तसेच ‘पायका झर’ असून या झरीच्या पाण्यावर आम्ही अवलंबून आहेत. जर खाण सुरू झाल्यास पाण्याचा स्रोत नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Qupem News
Goa Fraud Case : महाठग! आधी ड्रायव्हर मग IAS अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून घातला 10.55 लाखांचा गंडा

काजू बागायतींवर संकट

देवापान्न डोंगरावर कावरेतील लोकांच्या काजू बागायती असून ही जमीन वनक्षेत्रात येत असल्याने सुमारे 175 लोकांनी वन अधिकार कायद्याखाली जमिनीसाठी अर्ज केले आहेत, असे सतीश वेळीप यांनी सांगितले.

कावरे गावातील खनिज खाणीमुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्यात आणखी एक खाण सुरू झाल्यास आमच्यावर घरदार सोडून जाण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नियोजित खाण क्षेत्रात एका हंगामात 800 ते 1000 क्विंटल काजूचे उत्पादन होते. त्याशिवाय या परिसरात कदंबकालीन मंदिराबरोबर ग्रामदेवतांची असंख्य मंदिरे आहेत. तेथे धार्मिक कार्ये केली जातात. गावात मॅगनिजची खाण सुरू झाल्यास नैसर्गिक संपदा नष्ट होईलच; त्याशिवाय नैसर्गिक झरेही लोप पावतील.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याण मंत्री.

खाण सुरू झाल्यास कावरे गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. म्‍हणूनच सर्व ग्रामस्थ खाणीला विरोध करणार आहेत. तसा ठराव एकमताने संमत करून घेतला आहे.

- रवींद्र वेळीप, ग्रामस्‍थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com