'गोव्यातील निर्मात्यांना मदत करा'! आमदार सरदेसाईंची हाक; सरकारी शिष्टमंडळाच्या कान्स दौऱ्यावरुन हल्लाबोल

Vijay Sardesai Cannes Criticism: गोव्यातील एक मोठे शिष्टमंडळ सरकारी खर्चाने कान्स फिल्म महोत्सवात सहभागी होणार आहे
Vijay Sardesai Cannes Criticism
Vijay Sardesai Cannes CriticismDainiak Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील एक मोठे शिष्टमंडळ सरकारी खर्चाने कान्स फिल्म महोत्सवात सहभागी होणार आहे. अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी देताना सरकारने विदेशी दौऱ्यावर असा पैसा उधळण्यापेक्षा गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

गोवा हे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून प्रचार करण्यासाठी हे शिष्टमंडळ कान्सला जात असल्याचे सांगितले जात असून या दौऱ्यावर गोवा सरकार १ कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या गोव्यात चित्रपट निर्माण करायचा असेल तर निर्मात्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत गोवा हे चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून सरकार कसे तयार करेल असा प्रश्न करून हा विदेशी दौरा म्हणजे सरकारी खर्चाने केलेली पर्यटन सहल आहे, अशी टीका त्यांनी केली.

Vijay Sardesai Cannes Criticism
Bulbul Film Festival: 50 हजारांपेक्षा जास्त मुले, 73 चित्रपट; बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची यशस्वी सांगता

सरकारी अधिकारी आणि राजकीयदृष्ट्या जवळचे लोक परदेशात फिरत आहेत. अशा प्रतिनिधी मंडळात कोणाचा समावेश करण्यात आला आहे, याबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली. व्हेनिसला गेलेल्या आणि कान्सला जाण्याची शक्यता असलेल्या या शिष्टमंडळात भाजपाशी संबंधित असलेल्या गोवा मनोरंजन सोसायटीच्या सदस्यांची नावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्य सचिव आणि माहिती सचिव यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या महोत्सवाला उपस्थित राहण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अशा दौऱ्यांचा गोव्याला कोणताही प्रत्यक्ष फायदा होत नाही, असे ते म्हणाले. फ्रान्सच्या दक्षिण भागात असलेले कान्स हे जगातील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक असून अधिकारी करदात्यांच्या पैशांतून ऐषआरामी प्रवास करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Vijay Sardesai Cannes Criticism
Bulbul Film Festival: गोव्यात रंगणार 'बुलबुल बाल चित्रपट महोत्सव'! काय आहे तारीख, वेळ? जाणून घ्या..

सार्वजनिक निधीची ‘लूट’ थांबवा’

भाजप सरकार सत्तेत राहिले तर असा खर्च आणखी वाढत राहील, असा इशारा देत सरदेसाई यांनी सार्वजनिक निधीची ही “लूट” थांबवली पाहिजे, असे म्हटले. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यास अशा परदेश दौऱ्यांना पूर्णविराम देऊन गोव्याच्या प्रचारासाठी डिजिटल माध्यमे आणि आधुनिक ऑनलाइन धोरणांचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात राजकीय बदल होण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करत सरदेसाई यांनी म्हटले की, नवीन सरकार सत्तेत आले नाही तर गोव्याच्या जनतेला सार्वजनिक निधीच्या वाढत्या गैरवापराचा त्रास सहन करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Margao Master Plan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com