मडगाव: मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी 102 % लसीकरणाबाबत केलेल्या टिप्पणीवर लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यापेक्षा गणिताच्या पाठ्यपुस्तकातून टक्केवारी शिकण्याचा सल्ला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी दिला आहे. "प्रमोद सावंत यांनी जर खरोखरच 102 टक्क्यांचा शोध लावला असेल तर त्यांनी तो सार्वजनिक केला पाहिजे." असेही सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की गोव्याच्या 100% लोकसंख्येला कोविड -19 चा लसिकरणाचा पहिला डोस मिळाला आहे. तथापि, रविवारी आरोग्य विभागाने त्याच्या कोविड लसीकरण (Vaccination) बुलेटिनमध्ये सांगितले की, 1,152 व्यक्तींना त्यांचा पहिला डोस (रविवारी) मिळाला आहे. नंतर, या मुद्द्यावर उघड पडल्या नंतर सावंत म्हणाले होते की गोव्याच्या 102% लोकसंख्येला कोविड -19 चा लसिकरणाचा पहिला डोस मिळाला आहे.
31 ऑक्टोबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करण्याबाबत प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोस दरम्यानचे अंतर माहित असणे आवश्यक आहे, जे सुमारे 84 दिवस आहे. "10 सप्टेंबर रोजी ते म्हणतात की पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण झाले आहे आणि पाच दिवसांनी ते म्हणतात की 31 ऑक्टोबरपर्यंत दुसरा डोस गोव्याच्या संपूर्ण लोकसंख्येला दिला जाईल. हे कसे शक्य आहे?" असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे. "प्रमोद सावंत हे एक डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात संशोधन करण्याची गरज आहे. जर त्यांनी गणितामध्ये काही संशोधन आणि शोध लावायचा असेल तर त्यांना काही मूलभूत पाठ्यपुस्तके वाचावी लागतील. ही पुस्तके गोव्यातील पुस्तकांच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. " असे फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले.
"जगभरात, 100 पर्यंतची टक्केवारी शिकवली जाते. तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 102 %पर्यंत टक्केवारी शोधली आहे, म्हणून त्यांचा शोध सार्वजनिक झाला पाहिजे. असे केल्यास प्रत्येकाला त्याबद्दल माहिती मिळेल आणि त्यात नव काय आहे ते कळणार." असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.
" त्यांचा शोध सार्वजनिक झाल्यास भाजप कार्यकर्त्यांना गोव्याच्या गणितज्ञाची प्रशंसा करण्याची संधी मिळेल. " असे सरदेसाई म्हणाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.