Goa: 'मुख्यमंत्री बदलण्याचा विचार नाही'

येत्या निवडणुकीसाठी डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी स्पष्ट केले.
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गुजरात, (Gujarat) कर्नाटकसह चार भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री बदलले असले तरी गोव्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलण्याचा भाजपचा विचारच नाही, असे स्पष्ट करून येत्या निवडणुकीसाठी डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपतर्फे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यभर आयोजित ‘सेवा और समर्पण’ अभियानाचे आयोजन केले असून, त्या अंतर्गत आज शुक्रवारी म्हापसा येथील उत्तर गोवा भाजप कार्यालयात मोदी यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Sadanand Shet Tanawade
Goa: आयुष डॉक्टर्स वाढीव पगाराच्या प्रतिक्षेत

या वेळी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा (Joshua D'Souza), नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, बस्तोडाचे सरपंच रणजित उसगावकर, म्हापसा भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक सुशांत हरमलकर आदी पदाधिकारी हे उपस्थित होते. सदानंद तानावडे पुढे म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत हेच भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोवा दौऱ्यावेळी जाहीर केले होते. केंद्रीय नेतृत्वाने याअगोदरच या विषयावर भाष्य केल्याने मला त्यासंदर्भात वेगळे बोलण्याचा अधिकार नाही. कारण ते वरिष्ठ अधिकारी असून मी भाष्य करणे अयोग्य ठरेल.

Sadanand Shet Tanawade
Goa Elections: देवेंद्र फडणवीसांचा 20 तारखेला गोवा दौरा

उमेदवारीबाबत संसदीय समिती निर्णय घेणार...

तानावडे म्हणाले, भाजपच्या नियमित प्रक्रियेनुसारच प्रत्येक निवडणुकीवेळी मंडल समितीमार्फत उमेदवाराची निवड होते व केंद्रीय समिती त्याबाबत शिक्कामोर्तब करते. त्यामुळे, उमेदवारांबाबत योग्य वेळी केंद्रीय स्तरावरून निर्णय घेतला जाईल. दरम्यान, काही मतदारसंघात भाजपचे दोन-तीन इच्छुक उमेदवार असल्याने त्याबाबत काय निर्णय घेतला जाईल, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्याबाबत भाष्य करणे त्यांनी टाळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com