Velsao: वेळसाव येथे विना परवानगी रेल्वे ट्रॅक सर्वेक्षणाचा प्रयत्न; नागरिक आक्रमक

रेल्वे दुहेरी ट्रॅकिंगसाठी सर्वेक्षण करण्याच्या तयारीत रेल विकास निगम
double railway track survey
double railway track surveyDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: विना परवानगी, कागदपत्रे नसताना वेळसाव येथील एका भाटकाराच्या जमिनीत रेल विकास निगम लिमिटेडच्या कंत्राटदाराने आज पुन्हा काम सुरू केले होते. गोंयचो एकवोट व ग्रामस्थांनी ते तातडीने बंद पाडले. रेल विकास निगम लिमिटेडने खासगी जमिनीवर आपले बांधकाम उभारण्याचे वृत्ती बंद न केल्यास गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी तसेच गोंयचो एकवोट संघटनेने दिला यावेळी दिला.

(Velsao Citizens protest double railway track survey )

double railway track survey
Sand Extraction: गुन्हेगारांना ना धाक ना भय; खांडेपार नदीत अवैध वाळू उपसा सुरुच

वेळसाव गावातून दुपदरी रेल्वेमार्ग नेण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे. रेल्वे मार्गाच्या कडेला असलेली जागा खासगी आहे. त्यावर दक्षिण पश्चिम रेल्वेचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा गावकऱ्यांतर्फे करण्यात येतो. यासंबंधीचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मात्र, रेल विकास निगम लिमिटेडच्या कंत्राटदारामार्फत रेल्वे मार्गलगतच्या जमिनीवर बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. प्रत्येकवेळी गावकरी एकत्र येऊन सदर प्रयत्न हाणून पाडतात.

double railway track survey
Goa Water Bill Hike: रहिवासी संकुलांचा सरकारवर जोरदार 'हल्लाबोल'

आज शनिवारीही रेल विकास निगम लिमिटेडच्या कंत्राटदाराने रेलमार्गालगत. वेळसाव येथे रेल विकास निगम द्वारे अतिक्रमण करण्यास आले असता त्यांना थांबवले. यावेळी वेलसाव पाले येथे तणाव निर्माण झाला. रेल विकास निगम कर्मचारी वेळसाव लेव्हल क्रॉसिंगवर उतरले आणि खाजगी मालमत्तेत अतिक्रमण करून या क्षेत्रात जमीन सर्वेक्षण केले. गोएचो एकवोट सदस्यांसमवेत आलेल्या ग्रामस्थांनी रेल विकास निगमच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचा उद्देशाविषयी प्रश्न केला. यावेळी रेल विकास निगम जवानांनी रेल्वे दुहेरी ट्रॅकिंगसाठी त्या भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी आल्याचे मान्य केले.

गोएचो एक्वोटचे संस्थापक सदस्य ऑरविल दौरादो यांनी रेल विकास निगम सध्याच्या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे दावा करत आहे जी त्यांच्या पुर्वजांनी गावक-यांच्या प्रवासासाठी तसेच त्यांच्या निवासस्थानाकडे प्रवेश करण्यासाठी आहे. पंचायत राज कायदा 1994 नुसार पंचायतींना मिळालेल्या अधिकारांद्वारे गोवावासियांनी पुढे येऊन त्यांच्या वारशाचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोळसा प्रदूषणामुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या आम्हा गोवावासीयांना अंधकारमय भविष्याला सामोरे जावे लागेल असे दौरादो म्हणाले. या कामाबद्दल गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यापूर्वीही रेल विकास निगमने एका भाटकाराच्या जमिनीवरील माड कापले होते. जंक्शन बॉक्स उभारण्यापूर्वी संबंधित भाटकाराला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा परवानगी न घेता तेथे काम सुरू केले होते, असे सिमोईस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com