Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

Fatorda Fake Voters Allegations: ४५०० मतदारांना वगळण्‍यात आले आहे, असा गंभीर आरोप स्‍थानिक आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.
Fatorda Fake Voters Allegations
Fake Voters AllegationsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यातील सर्वांत मोठी मतचोरी फातोर्डा मतदारसंघात झाली आहे. २०१२ च्‍या मतदारसंघ फेररचनेनुसार २०१२ आणि २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्‍या ५० पेक्षा अधिक मतदारांची नावे ‘एसआयआर’नंतर त्‍यांच्‍या त्‍याच घरक्रमांकासह फातोर्डा मतदारसंघातील यादीत घुसडवली गेली आहेत.

तसेच ४५०० मतदारांना वगळण्‍यात आले आहे, असा गंभीर आरोप स्‍थानिक आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. पणजीतील पक्ष कार्यालयात शनिवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत सरदेसाई बोलत होते. ते म्‍हणाले, यामागे निश्‍चितच सत्ताधारी भाजपचा हात असून, मुख्‍य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. गोवा फॉरवर्डने आत्तापर्यंत केलेल्‍या तपासणीत ही बाब आढळून आली आहे.

Fatorda Fake Voters Allegations
Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

हस्‍तक्षेपानंतर हजारभर नावे पुन्‍हा समाविष्‍ट

२०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीतील मतदारयादी गठीत ठेवण्‍यात आली होती. त्‍यामुळे त्‍यावेळी अशा मतदारांचा आपल्‍याला शोध घेता आला नव्‍हता. ‘एसआयआर’ प्रक्रियेत फातोर्ड्यातील सुमारे ४५०० मतदारांना वगळण्‍यात आले आहे. त्‍याबाबतचा अभ्‍यास करताना कुडतरीतील मतदारांना यावेळी फातोर्ड्यात घुसडल्‍याचे आमच्‍या लक्षात आले. याबाबत गोवा फॉरवर्डने मुख्‍य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. ४५०० पैकी ६०० ते ७०० मतदार मृत पावले आहेत. गोवा फॉरवर्डने हस्‍तक्षेप केल्‍यानंतर एक हजार मतदारांची नावे पुन्‍हा समाविष्‍ट करण्‍यात आली, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

निवडणुकीचा निकाल बदलू शकतो!

गोमंतकीय जनतेत सध्‍या भाजपविरोधात लाट आहे. अशा परिस्‍थितीत फातोर्ड्यात जो प्रकार घडलाय, तो इतर मतदारसंघांतही घडला असावा. गत विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार अवघ्‍याच मतांनी निवडून आलेले आहेत. त्‍यामुळे अशा प्रकारांमुळे भाजप उमेदवारांना फायदा मिळून निवडणुकीचा निकाल बदलू शकतो, असा दावा सरदेसाई यांनी केला.

Fatorda Fake Voters Allegations
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com