Goa Weather: गोव्यात पावसाची जोरदार हजेरी! दाबोळीत 24 तासांत 4.62 इंच पाऊस; 2 दिवस यलो अलर्ट

Dabolim Rainfall: पणजी गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी पावसामुळे दिलासा मिळाला.
Dabolim Rainfall
Goa WeatherDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गेल्या चार-पाच दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी पावसामुळे दिलासा मिळाला. पहाटे चारच्या सुमारास सुरू झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

गेल्या २४ तासांत दाबोळीत सर्वाधिक ४.६२ इंच, तर मुरगावात १.२० इंच पावसाची नोंद झाली. पणजीत १९.२ मिमी, फोंड्यात १५.८ मिमी, वाळपईत १२.२ मिमी आणि पेडण्यात १०.२ मिमी पाऊस पडला.

Dabolim Rainfall
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

राज्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com