Goa Job Scam: पोलीस भरतीत मोठा घोटाळा; विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
Vijai Sardesai slams goa government on mining issue
Vijai Sardesai slams goa government on mining issue Dainik Gomantak

गोवा: गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, सरदेसाई यांनी या घोटाळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सहभागी असल्याचे सांगीतले.

(Vijay Sardesai alleged a big scam in police recruitment)

Vijai Sardesai slams goa government on mining issue
Goa News: चोडण-रायबंदर फेरीबोट बंद पडल्याने गोंधळ

गोव्यात उपनिरीक्षक भरतीत घोटाळा ; चौकशीसाठी पाच समित्या स्थापन

यापूर्वीही पोलिस खात्यातील उपनिरीक्षक पदासाठीच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची टीका झाली होती. तसेच त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निदर्शनासही आले. यानंतर पोलिस महासंचालकांनी चौकशीसाठी उपअधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पाच विविध समित्या स्थापन केल्या होत्या.

उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत झालेली हेराफेरी

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या नोकरभरती प्रक्रियेत झालेली हेराफेरी खात्याच्या अंतर्गत चौकशीत उघडकीस आली आहे. दोन उमेदवार हे शारीरिक कार्यक्षमता चाचणी अनुत्तीर्ण असूनही पात्र दाखविले. तसेच लेखी परीक्षेतही काही उमेदवारांना 95 ते 99 गुण मिळाल्याने संशय व्यक्त होत आहे.

या पाच ठिकाणी उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचण्या झाल्या होत्या

फोंडा, वाळपई, मडगाव, पणजी तसेच आल्तिनो येथे या पाच ठिकाणी उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचण्या झाल्या होत्या. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी देखील या चाचण्यांमध्ये सामील होते. तर प्रत्येक ठिकाणी पोलिस अधीक्षकाच्या अध्यक्षतेखाली एक वेगळी समिती होती, ज्यामध्ये हे अधिकारी निरीक्षण करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com