Goa News: चोडण-रायबंदर फेरीबोट बंद पडल्याने गोंधळ

चार बोटींवर ताण : दीड तासाने पोहोचली बोट; प्रवाशांत संताप
 Ferry Boat Service in Goa
Ferry Boat Service in GoaDainik Gomantak

पणजी: राज्यातील फेरीबोट सेवेतील सर्वात जास्त प्रवासी उपयोग करून घेणाऱ्या चोडण-रायबंदर जलमार्गावरील पाचपैकी एक फेरीबोट शुक्रवारी साडेनऊ वाजता बंद पडली. त्यामुळे चार फेरीबोटींवर ताण आल्याने चोडणहून रायबंदरला येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे याठिकाणी गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

(Confusion due to chorao Ribandar ferry closure)

 Ferry Boat Service in Goa
Goa News: ‘आयजीबीसी’सोबत लवकरच हरित इमारत संकल्पनेसाठी करार

पणजी ते चोडण या मार्गावर चालणारी सौर इलेक्ट्रिक हायब्रिड बोटीचे लोकार्पण गुरुवारी पार पडले, परंतु दुसऱ्याच दिवशी चोडण-रायबंदर मार्गावर चालणाऱ्या पाच फेरीबोटींपैकी एक फेरीबोट बंद पडली. त्यामुळे चार फेरीबोटींवर ताण आला.

सकाळी साडेनऊ वाजता फेरीबोट बंद पडल्याने डिचोली, सत्तरीतून येणाऱ्या लोकांना बराचवेळ फेरीची वाट पाहावी लागली होती. यावेळी अनेकांनी काही सुज्ञान नागरिकांनी येथील पुलाची उभारणी कधी होणार असा सवाल केला आहे. फेरीबोट सेवेवर किती दिवस अवलंबून राहायचे असेही प्रश्‍न उपस्थित करणारे नागरिक दिसून आले. त्याशिवाय फेरीबोट सेवा बंद पडल्यानंतर नेहमीप्रमाणे सरकारला दोष देणारेही काही कमी नव्हते.

प्रवाशांकडून समाज माध्यमांवर नाराजी

ज्या लोकांना या मार्गावरून येण्यास विलंब झाला किंवा अडथळा जाणवला त्यांनी आपली नाराजी माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करून व्यक्त केली. फेरीबोट बंद पडल्याची माहिती कार्यशाळेला दिल्यानंतर तेथून दुसरी फेरीबोट पाठविण्यासाठी दीड तासाचा विलंब लागला. त्यामुळे लोकांना सरकारी यंत्रणेला दोष देण्याची आणखी संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com