Pooja Naik: पुलिस आमचें Useless, 'त्या' तपास अधिकाऱ्यावरच 5 लाचखोरीचे गुन्हे; तपास कसा होणार? विजय सरदेसाई संतापले

Vijai Sardesai Pooja Naik Scam: आरोपी पूजा नाईक हिने मंत्री सुदीन ढवळीकर यांचे नाव घोटाळा प्रकरणात समोर आणल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे
Goa Job Scam
Goa Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Pooja Naik job scam update: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पूजा नाईक नोकरी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर अत्यंत कठोर टीका केली आहे. सरदेसाई यांनी तपास अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप करत, त्यांना 'चोर' संबोधलेय. आरोपी पूजा नाईक हिने मंत्री सुदीन ढवळीकर यांचे नाव घोटाळा प्रकरणात समोर आणल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

निष्पक्ष तपास कसा होणार?

या प्रकरणात मंत्री सुदीन ढवळीकर यांचे नाव असल्याचा उल्लेख करत आमदार विजय यांनी भाजपवर निशाणा साधला. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला सुदीन ढवळीकरांना बाजूला सरायचं असून हा कट रचला गेल्याचं ते म्हणालेत.

पुढे आमदार विजय सरदेसाई यांनी थेट तपास अधिकाऱ्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तपास अधिकाऱ्यावर आधीच लाचखोरीचे पाच प्रलंबित गुन्हे दाखल आहेत. सरदेसाईंनी विचारले की, "एका तपास अधिकाऱ्यावरच लाचखोरीचे पाच प्रलंबित गुन्हे असताना, आम्ही निष्पक्ष तपासाची अपेक्षा कशी करू शकतो?"

Goa Job Scam
Pooja Naik: 'ढवळीकरांच्या सांगण्यावरून देसाई, पार्सेकरांना पैसे दिले'! पूजा नाईकचा गौप्यस्फोट, पालेकरांनी केली निलंबनाची मागणी

'लोकांनी कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी?'

सरदेसाई यांनी पुढे विचारले की, इतक्या गंभीर घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी जर अशा वादग्रस्त अधिकाऱ्याकडे सोपवली जात असेल, तर लोकांनी कोणत्या प्रकारच्या न्यायाची अपेक्षा करावी?

यापूर्वी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा नाईकच्या स्फोटक आरोपानंतर नवीन एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सरदेसाईंच्या या टीकेमुळे आता तपास यंत्रणांवर आणि विशेषतः तपास अधिकाऱ्याच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com