Sanjivini Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीवर सरकार मधील काही प्रॉपर्टी डिलरांचा डोळा असल्यानेच येथे होऊ घातलेला इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यास दिरंगाई केली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षांचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज केला.
ऊस उत्पादकांना सरकारने देऊ केलेलीं नुकसान भरपाई त्यांना योग्य प्रकारे दिली जात नाही अशी तक्रार घेऊन काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधुवारी सरदेसाई यांची गोयकार घर मध्ये भेट घेतली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यावर यावर आपण विधानसभा अधिवेशनात आवाज उठवू असे आश्वासन त्यांनी या उत्पादकांना दिले.
या उत्पादकांच्या प्रश्र्नाबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले, सुरुवातीला सरकारने शेतकऱ्यांना पाच वर्षात इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार असे आश्वासन देताना तो पर्यंत या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले होते. यासाठी कमाल उत्पादन ग्राह्य धरून ही नुकसान भरपाई दिली जाणार असे सांगितले होते. मात्र त्यात आता बदल करून जेव्हढे पीक घेतले आहे तेव्हढीच नुकसान भरपाई देण्यात येणार असे म्हटले आहे. हा बदल म्हणजे सरकारने शेतकऱ्यां प्रती केलेला विश्वासघात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शेतकऱ्यांना शेती उत्पादनाकडून उस उत्पादनाकडे येण्यास प्रोत्साहित केले होते. आता हे सरकार त्यांचा असा विश्वासघात करत आहे. त्यामुळे भविष्यात गोव्यात उस उत्पादक राहतील की नाहीत याची शास्वती नाही असे सरदेसाई म्हणाले.
दरम्यान शेतकऱ्यांचे प्रतिनिधी गुरुदास गाड यांनी सरकारी धोरणामुळे गोव्यातील ऊस उत्पादक नुकसानीत आलेला असून या शेतकऱ्यांना सरकारने आधी ठरविल्या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी आणि इथेनॉल प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.