गोमन्तक डिजिटल टीम
नागार्जुन यांनी काळ्या पेहरावात आयनॉक्स परिसरात इंट्री केल्यावर उपस्थितांनी त्यांना गराडा घातला.
इफ्फी फियेस्टा आणि सफरनाम्याच्या उद्घाटनावेळी नागार्जुन उपस्थित होते.
सफरनामाच्या उद्घाटनानंतर नागार्जुन यांनी या प्रदर्शनात फेरफटका मारत माहिती घेतली व नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आस्वाद घेतला.
इफ्फीच्या निमित्ताने नागार्जुननी मुलगा नागा चैतन्य तसेच भावी पत्नी शोबिता हिच्यासह रेड कार्पेटवर हजेरी लावली.
भारत है हम ॲनिमेशन फिल्मच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी लोकांशी संवाद साधला.
आपल्या वडिलांच्या तसेच आजोबांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सफरनाम्यात त्यांनी फेरफटका मारला व आपल्या आठवणींना उजाळा दिली.
इफ्फीमध्ये भारतीय सिनेसृष्टीतील चार दिग्गज राज कपूर, महमंद रफी, तपन सिन्हा आणि एएनआर यांना मानवंदना देण्यात येत असल्याने त्यासाठीच मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.