VIDEO: ना काॅल, ना मेसेज... अचानक विमान रद्द! दाबोळी विमानतळावर प्रवाशांचा आक्रोश, 'IndiGo Airline'चा सावळा गोंधळ सुरुच

Chaos at Dabolim Airport: इंडिगो एअरलाईन्समध्ये चालू असलेल्या सावळ्या गोंधळाचा फटका देशभरातील प्रवाशांना बसत असून त्याचे प्रतिबिंब गोव्यातील दाबोळी विमानतळावरावरही पाहायला मिळाले.
Chaos at Dabolim Airport
Chaos at Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : इंडिगो एअरलाईन्समध्ये चालू असलेल्या सावळ्या गोंधळाचा फटका देशभरातील प्रवाशांना बसत असून त्याचे प्रतिबिंब गोव्यातील दाबोळी विमानतळावरावरही पाहायला मिळाले. मागील तीन दिवसांत विविध राज्यांतील अनेक उड्डाणे रद्द झाली असून काही उड्डाणे मोठ्या विलंबाने पोहोचत आहेत. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

दाबोळी विमानतळावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. काही उड्डाणे कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अचानक झालेल्या बदलामुळे अनेक जण संभ्रमात पडले असून विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Chaos at Dabolim Airport
Goa Politics: गोवा भाजपला हवेत ‘होय बा’! बाबूंचा घरचा आहेर; तोरसेतून केली कांबळींची उमेदवारी जाहीर

प्रवाशांनी इंडिगो एअरलाईन्सवर नाराजी व्यक्त करत आरोप केले की, “ना कॉल, ना मेसेज… उड्डाण रद्द केल्याची कोणतीही माहिती दिली नाही.” विमानतळावरील कर्मचार्‍यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी एअरलाईन्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अचानक उड्डाणे रद्द झाल्याने पर्यटकांचे टूर प्लॅन कोलमडले, तर व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे महत्त्वाचे कार्यक्रम हुकले. गर्दी, अडथळे आणि माहितीचा अभाव यामुळे दाबोळी विमानतळावर तणावाचे वातावरण कायम आहे.

Chaos at Dabolim Airport
Goa Tourism: इस्रायली पर्यटकांसाठी 'गोवा' सर्वाधिक लोकप्रिय! वाणिज्य दूत हॉफमन यांची स्तुतीसुमने; थेट विमानसेवेबाबत मंत्री खंवटेंशी चर्चा

दरम्यान, इंडिगो एअरलाईन्सकडून या गोंधळाबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रवासी मात्र तत्काळ तोडगा काढावा आणि उड्डाण सेवांबाबत निश्चित माहिती द्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com