Goa Crime: वेश्‍या व्यवसाय पीडितांच्या अनुपस्थितीमुळे संशयित विकी गोयल निर्दोष, मेरशी न्यायालयाचा निकाल

Panjim Case: मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित विकी गोयल याला पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
Prostitution Case
Prostitution CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वेश्‍या व्यवसाय प्रकरणाच्या खटल्यात न्यायालयात जबानी देण्यासाठी पीडित तरुणी अनुपस्थित राहिल्याने तसेच साक्षीदाराच्या जबानीत विसंगती आढळून आल्याने मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित विकी गोयल याला पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं आहे.

इतर दोन संशयित गायब आहेत, त्यांना अटक झाल्यावर हा खटला पुन्हा सुरू होणार असल्याने हे प्रकरण बंद करण्यात येऊ नये. त्यांना अटक झाल्यावर हा खटला पुन्हा सुनावणीसाठी उघडला जाईल, असे निवाड्यात म्हटले आहे.

पणजी पोलिस स्थानकाचे तत्कालिन निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी १८ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोना पावला येथील पास्तिना बीच रिसॉर्टजवळ ग्राहकांना वेश्‍या व्यवसासाठी तरुणी पुरवण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली होती.

Prostitution Case
Goa BJP: भाजपात आलेल्यांना शिस्त अंगवळणी पडतेय! नाईक यांचे स्पष्टीकरण; आजगावकरांविषयी कसलाही ठराव नसल्याचा दावा

यामध्ये दोन पीडित तरुणी तसेच पंकज कुमार (दिल्ली), विकी गोअल (दिल्ली) व रघू यांचा समावेश होता. पोलिसांनी ही कारवाई बोगस ग्राहक पाठवून केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयितांना जामीन मिळाला होता. जामिनावर असताना पंकज कुमार व रघू हे पसार झाले होते.

या खटल्यावरील सुनावणीवेळी आठजणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या. साक्षीदाराने पहिल्यांदा न्यायालयात दिलेल्या जबानीवेळी उपस्थित असलेले संशयित तेच आहेत का माहीत नाही, तर दुसऱ्यांदा हे संशयित तेच असल्याचे न्यायालयात सांगितले.

Prostitution Case
Goa Congress: ‘त्या’ 8 गद्दारांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही, माणिकराव ठाकरे कडाडले; अन्य पक्षाशी युतीबाबत भाष्य करणे टाळले

पोलिस संशयित व पीडित तरुणी यांच्यात काय संवाद झाला होता हे ऐकायला आले नाही. पंचनामा केलेल्याचे सिलिंग, पॅकिंग केव्हा करण्यात आले माहीत नाही. त्यामुळे साक्षीदाराला काही माहीत नाही, तर हा पंचनामा त्याच्या उपस्थित करण्यात आला आहे याबाबत संशय येतो.

साक्षीदाराने दिलेली साक्ष सत्य मानता येणार नाही. पैशांच्या व्यवहाराबाबत पोलिसांनी कोणताच पुरावा सादर केलेला नाही. संशयिताविरुद्धचे आरोप सादर केलेल्या पुराव्यावरून सिद्ध होत नाहीत असे न्यायालयाने निवाड्यात निरीक्षण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com