Goa Congress: ‘त्या’ 8 गद्दारांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही, माणिकराव ठाकरे कडाडले; अन्य पक्षाशी युतीबाबत भाष्य करणे टाळले

Manikrao Thakre: निवडणुकीच्या वेळी मतदार व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन युती बाबत पुढील पावले उचलली जातील, असे ठाकरे म्हणाले.
Manikrao Thakare, Goa Congress
Manikrao Thakare, Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: काँगेस पक्षाशी गद्दारी करून भाजप मध्ये गेलेल्या ‘त्या’ आठ गद्दारांना पुन्हा कधीही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही,असे कॉँग्रेसचे गोवा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत अन्य पक्षाशी युती करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर सरळ भाष्य करणे त्यांनी टाळले.

कॉंग्रेस मजबूत नाही का, असा प्रतिसवाल करून निवडणुकीच्या वेळी मतदार व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते विचारात घेऊन युती बाबत पुढील पावले उचलली जातील, असे ते म्हणाले.

मडगावात ठाकरे यांनी रविवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मडगाव कॉंग्रेस गट समितीतर्फे त्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा.सेवा दलाचे अध्यक्ष राजन घाटे, मडगाव गट काँग्रेसचे संयोजक सावियो कुतिन्हो व राधा कवळेकर उपस्थित होते.

Manikrao Thakare, Goa Congress
Goa Congress: गोवा काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून कुरघोड्या! राहुल गांधी, खरगेंसमोर चर्चा; ठाकरे, पाटकरांच्या उपस्थितीत कारवाईचे संकेत

दिगंबर कामत यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनविले. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. यामागे केवळ स्वार्थ होता. पद व भ्रष्टाचार हीच त्यांची नीती आहे. मडगावातून त्यांना नक्कीच पराभूत केले जाईल. पक्षाचा उमेदवार हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निवडला जाईल. दिल्लीतून तो निवडला जाणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

आठ आमदारांनी गद्दारी करून भाजपात तो गोव्याच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस होता असे अमित पाटकर म्हणाले. दिगंबर कामत मडगावच्या विकासासाठी भाजपात गेल्याचे सांगतात ,अजूनही मडगावात बसस्टँड होत नाही याला विकास म्हणावा का असे ते म्हणाले.

Manikrao Thakare, Goa Congress
Goa Congress: सरकारवर 'पक्षपातीपणा'चा आरोप, गोव्यात 304 कोटींचा 'महाघोटाळा'?

सावियो डिसिल्वा यांनी आम्ही गट समिती बळकट करणार असल्याचे सांगितले. सावियो कुतिन्हो यांनी सुरुवातीला स्वागत करताना मडगावात बजबजपुरी माजली असून लोक त्रासल्याचे सांगितले. रावणफोंड पुलासाठी ५४ कोटी खर्च दाखवितात. रिंग रोड होत नाही, असेही ते म्हणाले. स्नेहा वंसकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com