Goa News: अनेक वर्षांपासून गोव्यातील सर्व धर्मीय सयुदाय एकत्रीत : अँथनी बार्बाेझा

आर्चबिशप यांच्या निर्णयाचे बार्बाेझांकडून स्वागत
Vp of BJP ST Morcha Anthony Barbosa and Former MLA clafasio dias
Vp of BJP ST Morcha Anthony Barbosa and Former MLA clafasio diasDainik Gomantak
Published on
Updated on

आर्च बिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी संबंधित ख्रिस्ती धर्मगुरूंना इतरांच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करू नये किंवा कृती करू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. तसेच चर्चच्या नेतृत्वाने त्यांच्या संदर्भात योग्य ती कारवाई केली आहे असे सांगितले. बिशप पॅलेसमधून ही माहिती प्रसारित करण्यात आली होती.

दरम्यान आर्च बिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्या निर्णयाचे स्वागत भाजप नेते तथा एसटी मोर्चा उपाध्यक्ष अँथनी बार्बाेझा यांनी पत्रकार परिषद घेत केले. यावेळी माजी आमदार क्लाफासिओ डायस उपस्थित होते.

Vp of BJP ST Morcha Anthony Barbosa and Former MLA clafasio dias
Goa Bhandari Samaj Aam Sabha: भंडारी समाज आमसभेत प्रचंड गोंधळ; अध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार

बार्बाेझा म्हणाले, "ख्रिस्ती समुदायाने इतरांच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करू नये किंवा कृती करू नये असे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते. त्यांच्या या निर्णयाचे गोयकारांच्या व भाजपच्या वतीने स्वागत करतो."

"दुसऱ्या धर्मावर टीका करून सामाजिक हितसंबंध टिकू शकत नाही. गोव्यातील सर्व धर्माचे लोक गेली अनेक वर्षे एकत्रितपणे राहत आहेत. हा समाज विभागला जाऊ द्यायला नको."

"आपले घर मोडलेल्यास दुसऱ्याला दोषी न मानता आपणच सतर्क राहणे चांगले. कोणत्याही धर्माचा लोकांनी दुसऱ्या धर्मावर टिका करु नये. एका धर्मगुरुमुळे सर्व चर्चमधील धर्मगुरुंचे नाव खराब होत आहे" असे बार्बाेझा म्हणाले.

Vp of BJP ST Morcha Anthony Barbosa and Former MLA clafasio dias
Goa News: आंतरराज्य मद्य तस्करी रॅकेट; संंशयिताच्या शोधात गुजरात पोलिस गोव्यात

गोव्यात ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम या विविध धर्मांचे लोक एकत्र राहत आहेत. प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर राखतानाच दुसऱ्या धर्माचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी असे माजी आमदार क्लाफासिओ डायस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com