Goa News: आंतरराज्य मद्य तस्करी रॅकेट; संंशयिताच्या शोधात गुजरात पोलिस गोव्यात

गुजरात पोलिस व काणकोण पोलिसांच्या पथकाने मोहिम राबविली
Most Liquor Consuming State
Most Liquor Consuming StateDainik Gomantak

InterState Liquor Smuggling Racket: आंतरराज्य मद्य तस्करीच्या रॅकेटचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिस शनिवारी काणकोण येथे दाखल झाले. गुजरात पोलिस व काणकोण पोलिसांच्या पथकाने मोहिम राबवित काणकोण व होंडा सत्तरी येथे छापे टाकण्यात आले.

या मद्य तस्करीच्या रॅकेटमधील एका संशयिताचा शोध घेण्यास पोलिसांनी ही मोहिम राबवली. गांधीधाम पोलिसांत संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोव्यातील इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Most Liquor Consuming State
Goa-Delhi Flight: विमानात तरुणीने उघडला श्वानाचा पिंजरा; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिस संशयित लिगोरिनो डिसोझा याच्या शोधात गोवा राज्यात दाखल झाले. या संशयिताचा आंतरराज्य मद्य तस्करीच्या रॅकेटमध्ये समावेश असल्याचा संशय आहे. तसेच गुजरात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधीधाम गुजरातच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काणकोणा पोलिसांच्या मदतीने काणकोण व होंडा सत्तरी येथे छापे टाकण्यात आले. पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही.

गुन्ह्याच्या तपासात आम्ही गुजरात पोलिसांना मदत केली आहे. ते एका संशयिताच्या शोधात गोव्यात आले होते असे काणकोण पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी इंग्रजी संकेतस्थळाला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com