AITUC : कामगारांनो एकत्रितपणे लढा : ख्रिस्तोफर फोन्सेका

राज्यातील कामगार संघटनांद्वारे मोर्चा
AITUC Goa at Azad Maidan Panjim On International Workers'Day
AITUC Goa at Azad Maidan Panjim On International Workers'DayDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात तसेच देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. कामगारांच्या अनेक प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत आहे. यासाठी सर्व कामगारांनी, बेरोजगारांनी, पिडीत, वंचितांनी एकत्रितपणे लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले.

ते आतंराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस गोवा यांच्याद्वारे आयोजित मोर्चाला संबोधित करताना आझाद मैदान येथे कामगारांना संबोधित होते. आयटक नेते ॲड. सुहास नाईक, प्रसन्न उटगी व इतर मान्यवर उपस्थित होते.

AITUC Goa at Azad Maidan Panjim On International Workers'Day
Zero Shadow Day in Goa : आज येईल ‘शून्य सावली’च्या दिवसाची अनुभूती

या मोर्चाला राज्यातील विविध कामगार संघटनांचा समावेश होता. यात प्रामुख्याने गोवा पंचायत कामगार संघटना, कदंबा कामगार, सार्वजनिक बांधकाम, राज्यातील विविध औद्यागिक कंपनीतील कामगार संघटनांनी या मोर्चात प्रामुख्याने सहभाग नोंदविला होता. कदंबा बसस्थानक ते आझाद मैदान हा मोर्चा काढण्यात आला होता.

प्रसन्न उटगी कामगारांना संबोधित करताना म्हणाले, शिकागो येथे कामाची वेळ ८ तास असावी, यासाठी अनेक कामगारांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. काहींना फासावर चढविण्यात आले. त्या सर्वांप्रती आजच्या दिनी मी विनम्रता व्यक्त करतो.

देशात आठ तास काम करण्याचा कायदा असून देखील अजून योग्य ती अमंलबजावणी करण्यात येत नाही. फार्मा कपंन्यांद्वारे प्रामुख्याने या कायदाचे उल्लंघन करण्यात येत आहे, त्यांचा मी निषेध करतो.

AITUC Goa at Azad Maidan Panjim On International Workers'Day
Gomantak Editorial : कठोर कारवाई, हाच पर्याय!

विविध सुविधांत घट

ॲड. सुहास नाईक म्हणाले, या सरकारला कामगारांचे काही पडलेले नाही. कामगारांसाठी असणाऱ्या विविध सुविधांमध्ये घट करण्यात आली आहे. अजून राज्यात किमान वेतनाबाबत निर्णय घेतलेला नाही. देशात असमानता वाढली असून सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com