Zero Shadow Day in Goa : आज येईल ‘शून्य सावली’च्या दिवसाची अनुभूती

दुपारी 12.32 वाजताची वेळ : यंदा वर्षातील दोन दिवस येणार असा योग
Zero Shadow Day in Goa
Zero Shadow Day in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात. पण हे शंभर टक्के सत्य असेलच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात, की भर दुपारी काही क्षण आपली सावली, आपली साथ सोडून देते. या दिवसांना शून्य ‘सावलीचा दिवस’ असे म्हटले जाते.

मंगळवार, २ रोजी आपण याचा आपण अनुभव घेणार आहोत. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येतो.

यंदा आम्ही शून्य सावलीचा दिवस मंगळवार, २ मे रोजी दुपारी १२.३२ वाजता व नंतर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४० वाजता अनुभवणार आहोत. पणजी येथील गोवा विज्ञान केंद्र व प्लेनेटोरियममध्ये ‘शून्य सावलीचा दिवस’ साजरा केला जाणार असून हा क्षण अनुभवण्याची सोय केली आहे. इच्छुक लोकांनी व विद्यार्थ्यांनी केंद्रामध्ये उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

Zero Shadow Day in Goa
Michael Lobo : राज्यातील वाढते अपघात रोखा...आमदार लोबोंचा सरकारला सल्ला

म्हणून सावली दिसू शकत नाही

निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो, तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत आम्ही आमची सावली अनुभवू शकतो. सकाळी लांब, दुपारी अगदी लहान व सूर्यास्ताच्या वेळी परत लांब सावली आम्ही अनुभवतो.

भर दुपारीही आम्ही सावलीचा अगदी छोटा आकार अनुभवतो. पण वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो, त्यामुळे आपणास सावली दिसू शकत नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com