'वेर्णा- सडा दरम्यानचा रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी सुधारणेची गरज'

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी संध्याकाळी वेर्णा ते सडा दरम्यानचा रस्ता अपघाताच्या ठिकाणांपासून मुक्त होण्यासाठी आणखी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
Nitin Gadkari

Nitin Gadkari

Dainik Gomantak 

Published on
Updated on

वास्को: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी संध्याकाळी वेर्णा ते सडा दरम्यानचा रस्ता अपघाताच्या ठिकाणांपासून मुक्त होण्यासाठी आणखी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर व इतर यांच्या उपस्थितीत वरुणापुरी ते सडा जंक्शन दरम्यानच्या चौपदरी रोड पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर जनसमुदायाला संबोधित करताना गडकरी बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे महविकास आघाडी?

गडकरी (Nitin Gadkari) पुढे बोलताना म्हणाले की, जवळपास 75 टक्के कामे पूर्ण झाली असून वरुणापुरी ते सडा जंक्शन दरम्यानचा रस्ता पूर्णपणे मोटारीयोग्य असताना रस्त्यावरील ओव्हरब्रिजची कामे प्रलंबित आहेत. एनएडी आणि बोगमलो रोड जंक्शन दरम्यान सिग्नल फ्री टी जंक्शन सुरू करण्यासाठी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Godinho) यांच्या विनंतीवरून 400 कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

"मी रस्ते आणि जहाजबांधणी मंत्री या नात्याने सुरू केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन करताना माझ्यासाठी खूप आनंद होत आहे आणि त्यानंतर मला एमपीटी मिळाली होती. या प्रकल्पाच्या कामात अडथळे आले आणि एका क्षणी हे कामही थांबवण्यात आले आणि त्यानंतर अनेक बैठका झाल्या ज्यानंतर हा प्रश्न सोडवण्यात आला आणि संपूर्ण प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असताना, आमच्याकडे तीन रेल्वे ओव्हर ब्रिजेस आहेत ज्यांची प्रतीक्षा आहे. आमच्या जिद्दीमुळेच आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला. काही प्रलंबित कामे वर्षभरात पूर्ण होतील, असे गडकरी म्हणाले.

"माझ्या लक्षात आले आहे की या नवीन चार पदरी रस्त्यावर अपघाताची अनेक ठिकाणे असू शकतात आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. अपघातात लोकांचा मृत्यू होऊ नये अशी आमची इच्छा आहे कारण या रस्त्याचा वापर बंदरात आणि बाहेर जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी केला जाईल. मी माझ्या अधिकार्‍यांना संपूर्ण रस्त्याचा अभ्यास करून रस्ता तत्काळ सुधारण्याचे निर्देश देईन" गडकरी म्हणाले "सर्व ब्लॅक स्पॉट्स प्राधान्याने सुधारले जातील आणि मी माझ्या अधिकार्‍यांना रस्त्यालगतचे अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत,

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
महाराष्ट्राच्या धर्तीवरील आघाडी गोव्यातही आकाराला आणली जाणार काय?

विशेषतः शासनाने न घाबरता हा सार्वजनिक रस्ता आहे आणि त्यामुळे कोणतेही अपघात होऊ नयेत आणि या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारी विभागांना किंवा संरक्षण विभागाला नोटीस बजावली असली तरीही हा रस्ता अपघाताच्या ठिकाणांपासून मुक्त होईल याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व पावले उचलू." गडकरी म्हणाले

माविन गुदिन्हो यांच्या विनंतीवरून मी बोगमालो रोड येथे सिग्नल फ्री टी जंक्शनला आणखी ४०० कोटी किमतीची मंजुरी दिली आहे. या पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पासोबत सुमारे तीन रेल्वे आ ओव्हर ब्रीज ची कामे प्रलंबित असल्याचे आमच्या लक्षात आले आहे आणि आम्ही अत्याधुनिक गर्डर तंत्रज्ञान प्रस्तावित करू जेणेकरुन मध्यभागी पायर्सची गरज भासणार नाही आणि रेल्वेसाठीही कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि उर्वरित कामे पूर्ण करू शकतील. वर्षभरात पूर्ण करू, असे गडकरी शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com