Verna: व्‍यावसायिक वादातून भंगारअड्ड्याला आग, बेकायदा आस्‍थापनांना अभय का? केळशी परिसरात धुराचा प्रचंड त्रास

Verna-Quelossim Fire: वेर्णा-केळशी हद्दीतील एका मोठ्या भंगारअड्ड्याला शुक्रवारी (ता. १२) दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत विविध प्रकारच्या वस्तू खाक झाल्या.
Massive Fire Erupts at Verna–Quelossim Scrapyards
Massive Fire Erupts at Verna–Quelossim ScrapyardsDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वेर्णा-केळशी हद्दीतील एका मोठ्या भंगारअड्ड्याला शुक्रवारी (ता. १२) दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत विविध प्रकारच्या वस्तू खाक झाल्या.

अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आग आटोक्यात आल्याने आसपासच्या घरांना धोका निर्माण झाला नाही. मात्र, या आगीमुळे निर्माण झालेल्या दाट धुराचा त्रास आसपासच्या परिसरातील लोकांना सहन करावा लागला.

Massive Fire Erupts at Verna–Quelossim Scrapyards
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

या आगीत प्लास्टिक, तसेच विविध प्रकारच्या रासायनिक वस्तूंचे भंगार जळाल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले. या प्रदूषणाला जबाबदार भंगार अड्डेमालकांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे. मात्र, कठोर कारवाई होत नसल्याने भंगारअड्डेवाले अशा प्रकारच्या दुर्घटना गंभीरपणे घेत नसल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून दिसून येते.

आपण अवैधरीत्या भंगारअड्डा चालवतो...

भंगारअड्ड्याच्या मालकाच्या मते ही आग रिझवान नावाच्या व्यक्तीने लावली आहे. त्या जागेबद्दल त्यांच्यामध्ये वाद होता. शुक्रवारी सकाळपासून रिझवान तेथे दादागिरी करीत होता. आग लावण्यापूर्वी त्याने आपला सर्व भंगार तेथून हटविला. त्यानंतर दुपारी आपण नमाजासाठी गेल्यावर त्याने आग लावली, आग लावताना त्याला इतर लोकांनी पाहिले असा दावा त्या भंगारअड्ड्यावाल्याने केला.

Massive Fire Erupts at Verna–Quelossim Scrapyards
Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

हा अड्डा कोमुनिदादच्या जमिनीवर आहे. त्या जागेसाठी आपण जुझे नावाच्या व्यक्तीला भाडे देत होतो. या भंगारअड्ड्याबद्दल आपल्याकडे कोणतेही परवाने नाहीत. आपण अवैधरीत्या हा भंगारअड्डा चालवित असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या अड्ड्याबद्दल आपणास नोटिस देण्यात आली होती. त्यासंबंधी आपण पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयाला उत्तर दिले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे तो म्हणाला.

भंगार अड्ड्यामुळे शेती पडीक

यासंबंधी माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ हे केळशीचे पंच तावारिस यांच्यासह घटनास्थळी आले. त्यानी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. हा भंगारअड्डा तोडण्यासंबंधी पंचायतीने नोटिस दिली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे तसेच वीज खात्याचे कोणी उपस्थित न राहिल्याने कारवाई होऊ शकली नाही. मात्र आता हा अड्डा हटविण्यात येणार असून तिथे शेती करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल, असे वाझ यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com